Kirit Somaiya | माझ्या 90 वर्षांच्या आईविरोधातही तक्रार करा, आम्ही झुकणार नाहीत, भाजप नेते किरीट सोमय्यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्यावर संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे. मीरा-भाइंदर महापालिका क्षेत्रात कांदळवनाची कत्तल करून पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता बफर झोन व सीआरझेड क्षेत्रात 16 ठिकाणी बेकायदेशीररित्या शौचालये उभारत 3 कोटी 90 लाख रुपयांचे बिल लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुंबईः संजय राऊत आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आमच्या कुटुंबातील कुणाविरोधातही तक्रारी केल्या तरी आम्ही झुकणार नाहीत. माफिया सरकार आणखी काय करू शकतं? असा थेट इशारा भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. किरीट सोमय्यांप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somiya) यांना आज आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या प्रकरणी तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नये, असे निर्देश कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. मात्र अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. किरीट सोमय्या यांचीदेखील आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी 3 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
‘माफिया सरकार हेच करू शकते’
संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर आरोप करताना या दोघांनाही जेलमध्ये टाका. पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवा, अशी भाषा वापरल्याची आठवण किरीट सोमय्या यांनी करून दिली. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचं माफिया सरकार अशीच भाषा वापरू शकते. पण न्यायालयाने खरी बाजू उचलून धरली. नील सोमय्या यांनाही कोर्टानं प्रोटेक्शन दिलं आहे. त्यांच्याविरोधात फर्जी एफआयआर दाखल केल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे,’ असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.
‘माझ्या 90 वर्षांच्या आईविरोधताही तक्रार करा’
किरीट सोमय्या यांची पत्नी मेघा सोमय्या यांच्याविरोधातही संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी माझ्यासकट नील सोमय्या, मेघा सोमय्या इतकच काय तर माझ्या 90 वर्षांच्या आईवरही आरोप केले तरी आम्ही सर्वांना पुरून उरू. आम्ही झुकणार नाहीत.. असा इशारा सोमय्या यांनी दिला.
मेधा सोमय्यांवर काय आरोप?
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांच्यावर संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याचा आरोप केला आहे. मीरा-भाइंदर महापालिका क्षेत्रात कांदळवनाची कत्तल करून पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता बफर झोन व सीआरझेड क्षेत्रात 16 ठिकाणी बेकायदेशीररित्या शौचालये उभारत 3 कोटी 90 लाख रुपयांचे बिल लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. वनविभागाने या प्रकरणी चौकशीदेखील सुरु केली आहे.
इतर बातम्या-
