AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अत्यंत धक्कादायक… 3 अधिकाऱ्यांकडून आमच्यावर बलात्कार होतोय, 8 महिला पोलिसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Mumbai lady Police Serious Allegation on Police Officer : 8 महिला पोलिसांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप या महिला पोलिसांनी केला आहे. वाचा सविस्तर बातमी...

अत्यंत धक्कादायक... 3 अधिकाऱ्यांकडून आमच्यावर बलात्कार होतोय, 8 महिला पोलिसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
| Updated on: Jan 08, 2024 | 10:40 AM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 08 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात खळबळ उडवणारी घटना… पोलीस दलातील अत्यंत धक्कादायक बातमी… मुंबई पोलीस दलातील आठ महिलांकडून पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्तांसह तीन अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आठ महिला याबाबत पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. या महिला पोलिसांच्या पत्रामुळे मुंबई पोलीस दलातील अत्यंत गंभीर बाब समोर आली आहे. महिला पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या घटेनेची सखोल चौकशी होणार आहे.

महिला पोलीसांचे गंभीर आरोप

मुंबईच्या नागपाडामधील मुंबई पोलीस दलाच्या ट्रान्सफर डिपार्टमेंट आठ महिला पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे पत्र लिहिलं आहे. एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरिक्षक आणि आणखी एका अधिकाऱ्यावर या महिला पोलिसांनी आरोप केले आहेत. तुम्हाला कमी काम लावतो, असं अमिष दाखवून महिलांचं शोषण केलं गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. पोलिसांच्या सरकारी निवासस्थानी नेऊन या महिला पोलिसांवर अत्याचार केला गेल्याची माहिती आहे.

आठ महिला पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्यावर बलात्कार झाल्याचं या महिला पोलिसांनी म्हटलं आहे. या गंभीर घटनेबाबत महिला पोलिसांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. या घटनेची वरिष्ठ तपास यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी या महिला पोलिसांनी केली आहे. या पत्राची गंभीर दखल घेण्यात आली आहे आणि चौकशीही सुरु करण्यात आली आहे.

महिला पोलिसांचा ‘लेटरबॉम्ब’ अन् काही सवाल

जिथे कायदा आणि सुव्यस्था राखली जाते. जिथे सामान्या नागरिकांचं संरक्षण केलं जातं त्याच पोलीस खात्यातील पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले आहेत. ‘निर्भया पथक’ सारखी पथकं महिलांच्या संरक्षणासाठी रात्री गस्त घालतात. मात्र याच पोलीस दलातील महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्याच कारण आहे. मुंबई पोलीस दलातील तब्बल आठ महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गंभीर आरोप लावालेत. महिला पोलिसांनी टाकलेल्या या ‘लेटर बॉम्ब’मुळे पोलीस दलातील महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.