AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान 8 प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. 8 लोक पडले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून येणार आहे.

Mumbai Train Accident : मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान 8 प्रवाशांचे जीव गेल्यानंतर रेल्वे बोर्डाने घेतला मोठा निर्णय
Mumbai Train Accident
| Updated on: Jun 09, 2025 | 11:33 AM
Share

आज मुंबईत एक भीषण रेल्वे अपघात झाला. यात 8  रेल्वे प्रवाशांनी आपले प्राण गमावले. कसाऱ्याहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून आठ प्रवाशांचा मृत्यू झाला. सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. लोकलच्या दरवाजाला लटकलेले प्रवासी जवळून जाणाऱ्या एक्स्प्रेसला घासले गेले. त्यातून हा भीषण अपघात झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. त्याशिवाय काही प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी फुटबोर्डवरून प्रवास करत होते. एकमेकांना त्यांच्या बॅगा लागल्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे ते ट्रेनमधून पडले असावेत.

या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर आता रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला आहे. पहिला निर्णय म्हणजे नवीन येणाऱ्या गाड्या या ऑटोमॅटिक डोअर क्लोजरसोबत असतील. 238 एसी लोकल मुंबई सबर्बनसाठी घेतल्या आहेत. ज्या गाड्या घेतल्या आहेत, त्या ऑटोमॅटिक डोअर क्लोजर सिस्टिमने येणार आहेत.

9.50 वाजता रुग्णवाहिका पोहोचली

दुसरा निर्णय असा आहे की, आयसीएफद्वारे एक्झिस्टिंग लोकलला रेट्रो फिकमेंटच्या माध्यमातून दरवाजे बंद करण्याची सिस्टिम लावणार आहोत. असा निर्णय आता घेतला आहे. 8 लोक लोकलमधून पडले. त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिका मागवली होती. 9.30 वाजता घटना घडली. 9.50 वाजता रुग्णवाहिका पोहोचली. सर्व व्यक्तींना रुग्णालयात नेले. ते लोकलच्या फुटबोर्डवरून प्रवास करत होते. पुन्हा अशा घटना घडू नये म्हणून आपोआप दरवाजा बंद होणाऱ्या ट्रेन रेल्वेच्या सेवेत असणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान

मुंब्रा-दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात झाला. एक गाडी कसाऱ्याकडे जात होती, एक छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ट्रेन फास्ट होती. 8 लोक पडले. त्यांना रुग्णालयात नेले. त्यांच्या प्रकृतीची माहिती रुग्णालयाकडून येणार आहे. मध्य रेल्वेने कल्याणपासून कसाऱ्यापासून तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान केला आहे. तसेच कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या चौथ्या लाईनचाही प्लान केला आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

प्रवासी पडले त्या दोन्ही लोकल ट्रेन

तसेच दादर पासून किंवा दिव्यापर्यंत सीएसएमटी पर्यंत पाचव्या सहाव्या लाईनची प्लानिंग केली आहे. ही प्लानिंक कुर्ल्यापर्यंत पूर्ण झाली आहे. त्यापुढे जमीन मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच 15 डब्ब्यांच्या गाड्या वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आपण सिग्नल सिस्टिम अपडेट केली आहे. पायाभूत सुविधाही आपण अपग्रेड करत आहोत. पायाभूत सुविधा अपडेट केल्यावर लोकलच्या फेऱ्याही वाढवण्यात येणार आहे. दोन्ही लोकल ट्रेन होत्या. पुष्पक एक्सप्रेस नव्हती. लोकल गाड्यांमध्ये ही घटना घडली आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.