AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये ज्या महिलेवर हात उचलला, मारायला बेल्ट काढला, ती भारतीय नाही, नवी अपेड्ट

Mumbai Local Train : हार्बर मार्गावर गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 5 ऑगस्टला संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंधेरी रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली. ट्रेन जोगेश्वरी स्टेशनवर आल्यानंतर आरोपी ट्रेनमध्ये चढला.

Mumbai Local Train : मुंबई लोकलमध्ये ज्या महिलेवर हात उचलला, मारायला बेल्ट काढला, ती भारतीय नाही, नवी अपेड्ट
Mumbai Local Train Incident
| Updated on: Aug 08, 2026 | 12:27 PM
Share

मुंबईत लोकल प्रवास महिलांसाठी अजिबात सुरक्षित नाही हे अधोरेखित करणारी एक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या एका महिला प्रवाशाला लोकल ट्रेनमध्ये मारहाण झाली. आरोपी हातात बेल्ट घेऊन महिलेला धमकावत असल्याचा व्हिडिओ, फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून लोकं चिडली आहेत. नागरिकांच्या मनात राग, संतापाची भावना आहे. मुंबई लोकलमध्ये गर्दीच्यावेळी बसायला जागा मिळणं ही मोठी गोष्ट असते. याच बसण्याच्या जागेवरुन हा प्रकार घडला. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद रिझवान अन्सारी असं आरोपीचं नाव असून अंधेरी रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपी मोहम्मद अन्सारी रहायला गोवंडीला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिला नेपाळची नागरिक आहे. त्याने मारहाण का केली? अशी परिस्थिती का ओढवली? हे शोधून काढण्यासाठी पोलिसांकडून आरोपीची कसून चौकशी सुरु आहे. हार्बर मार्गावर गोरेगाव ते सीएसएमटी दरम्यान 5 ऑगस्टला संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली. अंधेरी रेल्वे पोलिसांनी ही माहिती दिली. महिला लोकलमध्ये झोपून गेलेली. ट्रेन जोगेश्वरी स्टेशनवर आल्यानंतर आरोपी ट्रेनमध्ये चढला. बसण्यासाठी त्याला जागा हवी होती. म्हणून त्याने त्या जागी झोपलेल्या महिलेला उठवलं. बसण्यासाठी जागा दे असं सांगितलं. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. तो पर्यंत ट्रेन अंधेरी स्टेशनपर्यंत पोहोचलेली. शाब्दीक वादावादीने हिंसेचं रुप घेतलं. आरोपीने त्याच्या कमरलेला लावलेला पट्टा काढला व महिलेला धमकावू लागला. त्याने महिलेवर हात सुद्धा उचलला.

आपण इतके असंवेदनशील आहोत का?

सहप्रवाशांनी त्या महिलेला मदत करण्याऐवजी या घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण केलं. नंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल झाला. या मारहाणीचा युजर्सनी निषेध केलाच. पण डब्ब्यात असलेल्या प्रवाशांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. कोणीच मध्ये का पडलं नाही? आपण इतके असंवेदनशील आहोत का? असे प्रश्न विचारले जातायत. या व्हायरल क्लिपमुळे पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं. अंधेरी रेल्वे पोलिसांनी महिलेला शोधून तिची जबानी नोंदवली. त्यानंतर एफआयआर दाखल केला.

तो स्वत:च वडाळा जीआरपीकडे गेला

आरोपी मोहम्मद रिझवान अन्सारीने वडाळा स्टेशनवर उतरल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तो स्वत:च वडाळा जीआरपीकडे गेला व तृतीयपंथीयासोबत वाद झाल्याचं सांगितलं. पोलिसांनी व्हायरल व्हिडिओ नीट पाहिला. घटनाक्रम जुळवला व आरोपीला गोवंडी भागातून अटक केली.

Follow Us
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार