शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे सुरु करण्यास परवानगी, सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? प्रवासी संघटनांचा सवाल

ठाकरे सरकारनं शाळा 4 ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं 7 ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.

शाळा, मंदिरे, चित्रपटगृहे  सुरु करण्यास परवानगी, सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? प्रवासी संघटनांचा सवाल
Mumbai Local
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 10:37 AM

मुंबई: ठाकरे सरकारनं शाळा 4 ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं 7 ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार आता सर्व गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे. यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.

बहुतांश नोकरदार 18- 44 वयोगटातील

15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, 18 ते 44 वयोगटातील बहुतांश नोकरदार आहे. 45 ते 60 वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे, तर 60 हून अधिक वयाचे प्रवासी आता प्रवास करणे टाळत आहेत. तिकीट मिळत नसून फक्त पास दिला जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

महिन्यातून दोनवेळा जाण्यासाठी पास का?

लोकलमधून जर महिन्यातून दोन वेळा जायचे तर महिन्याचा पास का काढायचा हा प्रश्न आहे. तसेच बहुतांश कामगार 18 ते 44 वयोगटातील असल्याने त्यांना जूनमध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यांपैकी काहीजणांचे दोन डोस अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद आहे.

मध्य रेल्वेवर 10 तासांचा ब्लॉक

मध्य रेल्वेवर आज सकाळापासूनच दहा तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. मेल-एक्स्प्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर ‘एमआरव्हीसी’मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येतोय. यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. यावेळी अनेक लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने जादा बस सेवा देण्याची विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे केली आहे. हार्बर मार्गावरील ब्लॉक सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी / वांद्रे डाऊन मार्गावर आणि चुनाभट्टी / वांद्रे ते सीएसएमटी पर्यंत 11.10 ते संध्याकाळी 4.10 पर्यंत असेल.

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू करणार

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली

इतर बातम्या:

‘त्या’ पत्रामुळे चंद्रकांतदादांचेच धोतर सुटले, महाराष्ट्रातील विरोधकांची हास्यजत्रा! किती मनोरंजन कराल?; राऊतांची शेरेबाजी सुरूच

महिलेच्या सूचनांचं खारुताईकडून जसच्या तसं पालन, फटाफट संपवले बदाम, व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Mumbai local travellers organization demands permission for local travel to all

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.