AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग

मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

मुंबईतील इलेक्ट्रॉनिक्स शोरूमच्या इमारतीत भीषण आग
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Apr 29, 2025 | 8:20 AM
Share

मुंबईतील वांद्रे परिसरातील एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमच्या इमारतीत मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पोहचला आहे. आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त अद्याप नाही. ही आग ती भीषण होती की, आगीत मॉलमध्ये असलेले शेकडो दुकाने जळून खाक झाली.

मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरातील लिंकिंग रोडवरील एका बहुमजली इमारतीत आग लागली. वांद्रे येथे असलेल्या लिंक स्केअर मालमधील क्रोमा शोरुमला ही आग लागली. बेसमेंटमध्ये ही आग लागल्यानंतर ती तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचली आहे. आगीमुळे या भागातील रस्ते बंद करण्यात आले आहे. सकाळचे आठ वाजले तरी आग नियंत्रणात येत नाही. यामुळे आग विझवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून रोबोटिक मशीनचा वापर केला जात आहे.

घटनास्थळी शेकडो अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यासह एनडीआरची टीम देखील दाखल झाली आहे. अग्निशमन दलाची यंत्रणा कर्मचाऱ्यांना वापरता येत नसल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे. सध्या आपला माल वाचवण्यासाठी दुकानदार जीवाची बाजी लावत आहे.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस पथक आणि अग्निशमन दलाच्या ३५ गाड्या आणि इतर अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. रोबोटीक मशीन आणली गेली आहे. ज्या ठिकाणी अग्नीशमन दल पोहचू शकत नाही, त्याठिकाणी रोबोटीक मशीन वापरल्या जात आहेत.

वांद्रे भागातील लिंकिंग परिसरात ही आग लागली. आग सकाळी चार वाजता लागली तेव्हा पोलीस किंवा अग्नीशमन दलाचे अधिकारी आले नसल्याचा आरोप मॉलचे मालक सिद्दीकी  यांनी केला आहे. ते म्हणाले की, सकाळी सहा वाजता आग विझवण्याचे काम सुरु झाले. त्यामुळे आग वाढली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सिलेंडर होते. त्या सिलेंडरला काही झाले असते तर संपूर्ण लिकींग रोड परिसरात आग पसरली असती, असे सिद्दीकी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले.

दोन दिवसांत दुसरी आग

गेल्या दोन दिवसांत मुंबईत पहाटे लागलेली ही दुसरी मोठी आग आहे. रविवारी बॅलार्ड इस्टेट परिसरातील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या इमारतीत भीषण आग लागली होती. त्यात अनेक कागदपत्रे जळाली आहे. परंतु ही सर्व कागदपत्रे डिजिटलाज करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीला पहाटे अडीचच्या सुमारास आग लागली.

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद