Kishori Pednekar : भाजप म्हणतंय संपूर्ण मुंबई काबीज करणार, त्यांचे केवळ दोन तीन नगरसेवक सक्रिय, किशोरी पेडणेकर यांचा टोला

Kishori Pednekar : भाजप म्हणतंय संपूर्ण मुंबई काबीज करणार, त्यांचे केवळ दोन तीन नगरसेवक सक्रिय, किशोरी पेडणेकर यांचा टोला
किशोरी पेडणेकर, महापौर

गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसेना सत्तेत आहे. आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे या वेळेस सुद्धा शिवसेना बहुमताने पालिकेत सत्तेत येईल हा आमचा विश्वास आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 26, 2022 | 8:49 AM

अक्षय मंकणी, टीव्ही 9 मराठी, मुंबई: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त महापौर यांच्या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. भाजपच्या (BJP) स्वबळावर मुंबईवर (Mumbai) कब्जा मिळवण्याच्या दाव्यावर पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कोण काही बोलत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा संबंध आहे. कार्यकर्त्यांची ऊर्जा वाढवण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय. बऱ्याच पक्षातून इकडून तिकडून आलेल्या नेत्यांना थोपवण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असतील, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. गेली अनेक वर्ष मुंबई महानगरपालिकेत शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वात शिवसेना सत्तेत आहे. आमचा मुंबईकरांवर विश्वास आहे या वेळेस सुद्धा शिवसेना बहुमताने पालिकेत सत्तेत येईल हा आमचा विश्वास आहे, असं पेडणेकर यांनी सांगितलं.

आक्रमक व्हा म्हणजे चांगल्या कामांना विरोध

कोणी किती आक्रमक व्हावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपचे अनेक नगरसेवक नुसते आरोप करतात आणि आरोप केल्यानंतर पेपरांचे गठ्ठे पाठवून देतात. परंतु त्याच्यापुढे कोणतेही फॉलोअप ते करत नाहीत, असा माझा अनुभव आहे. अधिक आक्रमक व्हा म्हणजे चांगल्या कामांना विरोध करा, असं वाटतंय. भाजप म्हणते की आम्ही संपूर्ण मुंबई काबीज करणार आहे परंतु त्यांच्या नगरसेवकांचा कामाचा आढावा त्यांनी घेतला पाहिजे. भाजपचे दोन-तीन नगरसेवक वगळता सक्रिय असं कोणी मला दिसत नाही, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

त्या मैदनाला झाशीच्या राणीचं नाव द्यावं

मुंबईतील टिपू सुलतान मैदानावरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. त्या संबंधित मैदानाला राज्य सरकारचा निधी वापरला गेलेला आहे. आमच्या कार्यालयात त्याचा सीटीएस नंबर मलाड मालवणी मैदान असच आहे. काल शिवसेनेने या प्रकरणासंदर्भात आंदोलन केलं आणि त्या मैदानाला झाशीची राणी नाव देण्यात यावं ही मागणी सुद्धा केली आहे. काल या आंदोलनामध्ये फक्त शिवसेना उतरली होती जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी काल आमच्या आंदोलनामध्ये उतरल पाहिजे होतं, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी भाजपला लगावला आहे. मैदानाला जे बोर्ड लावण्यात आले आहे त्यात म्हाडाचं चिन्ह आहे आणि पालिकेने कोणतही नामकरणाचा बोर्ड हा लावलेला नाही, असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं.

इतर बातम्या :

BMC Election 2022 : ‘कमळ फुलणार की कोमेजणार हे निवडणुकीत कळेल’, महापौर पेडणेकरांचा भाजपवर पलटवार

मुंबई महापालिकेसाठी भाजप-मनसे युती होणार? जाणून घ्या भाजपच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

Mumbai Mayor Kishori Pednekar slam over BJP claim to win BMC Election

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें