घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो आता एक तास लवकर सुटणार

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: चेतन पाटील, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 6:07 PM

अंधेरी जवळील गोखले उड्डाण पूल बंद करण्यात आल्याने मेट्रोच्या अंधेरी परिसरातील स्थानकांमधील प्रवाशांची गर्दी अचानक वाढली आहे.

घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो आता एक तास लवकर सुटणार
mumbai metro one
Image Credit source: social

अतुल कांबळे, TV9 मराठी, मुंबई :  घाटकोपर ते वर्सोवा धावणार्‍या मुंबई मेट्रो वनची पहिली ट्रेन आता एक तास लवकर म्हणजे सकाळी 5.30 वाजता सुटणार आहे. सोमवारपासूनच कोरोनापूर्व काळाप्रमाणे मुंबई मेट्रो वनचे वेळापत्रक पूर्ववत करण्यात आले आहे.

घाटकोपर आणि वर्सोवा येथून दोन्ही दिशेकडून सकाळी 5.30 वाजता पहिली ट्रेन रवाना होणार आहे. तर वर्साेवा स्थानकातून  शेवटची ट्रेन रा. ११.२० वा. तर घाटकोपरहून शेवटची ट्रेन रात्री 11.45 वाजता सुटणार असल्याचे मुंबई मेट्रो वन प्रशासनाने म्हटले आहे.

आता मुंबई मेट्रो वन दररोज 380 फेऱ्या चालविणार आहे. त्याआधी मेट्रो 366 फेऱ्या चालवित होती. यापूर्वी मेट्रोची पहीली ट्रेन अंधेरी आणि घाटकोपरहून स.6.30 वाजता सुटायची.

आता पिकअवरला दर 4 मिनिटांनी तर नॉन पिकअवरला दर 5 ते 8 मिनिटांना एक फेरी चालविण्यात येईल असे मुंबई मेट्रो वन प्रशासनाने म्हटले आहे. कोरोनाकाळानंतर प्रथमच मुंबई मेट्रो वन पूर्वीप्रमाणेच तिच्या मूळ वेळापत्रकानूसार चालविण्यात आहे.

सध्या मुंबई मेट्रो वनने 3 लाख 80 हजार प्रवासी दररोज प्रवास करीत आहेत. कोरोनाच्या काळानंतर निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबई मेट्रो वन स. 8.30 ते सायं.8.30 अशी सुरु करण्यात आली हाेती.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI