Mumbra Kalwa Assembly Constituency : मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय?

Mumbra Kalwa Assembly constituency Vidhansabha Election 2024 : राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. अशात मुंबईतील काही मतदारसंघातील लढतींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय स्थिती काय? वाचा सविस्तर बातमी...

Mumbra Kalwa Assembly Constituency : मुंब्रा- कळवा विधानसभा मतदारसंघाची सद्यस्थिती काय?
विधानभवनImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 3:19 PM

राज्यात सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे. 288 जागांवर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होत आहे. या 288 पैकी काह मतदारसंघांमधील लढतींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. मुंबईतील काही मतदारसंघात अटीतटीची लढाई पाहायला मिळणार आहे. असाच एक म्हणजे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ… या मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मुस्लीम बहुल या मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होत आहे. यावेळी या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट अशी लढत होत आहे.

जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नजीब मुल्ला हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जितेंद्र आव्हाड मागच्या 15 वर्षांपासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. तीन वेळा लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. 2009 पासून ते मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. तसंच 2019 ते 2022 या काळात ते राज्याचे गृहनिर्माणमंत्री राहिले आहेत. मागच्या वर्षी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आता विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे शरद पवार गट विरूद्ध अजित पवार गट असा थेट सामना होत आहे.

या आधीच्या निवडणुकींमधील निकाल

2009 ला या मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड पहिल्यांदा निवडून आहे. 15 हजार 689 मतांनी ते आघाडीवर होते. तर 2014 ला त्यांनी 47 हजार 683 मतांनी विजय मिळवला. 2019 ला तर तब्बल 75 हजार 639 मतांच्या फरकाने जितेंद्र आव्हाड यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे यंदा या भागात कोण विजयी होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघ हा मुस्लीम बहुल आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मुस्लीम मतदार आहे. तिथे जितेंद्र आव्हाड यांना निवडून पाडण्यासाठी अजित पवार यांनी मुस्लीम उमेदवाराला रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Non Stop LIVE Update
मर्दाची औलाद असते तर...,आव्हाडांची अजितदादांसंदर्भात बोलताना जीभ घसरली
मर्दाची औलाद असते तर...,आव्हाडांची अजितदादांसंदर्भात बोलताना जीभ घसरली.
पाडव्यानंतर भाऊबीजही वेगळी, गोविंदबागेत अजित दादांचं कुटुंब गैरहजेर
पाडव्यानंतर भाऊबीजही वेगळी, गोविंदबागेत अजित दादांचं कुटुंब गैरहजेर.
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.