AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत इथं होणार सर्वात स्पेशल नवरात्रोत्सव ? टॉप 10 गरबा कोणते? पाहा A टू Z डिटेल्स

मुंबईत या नवरात्री उत्साहात सामील व्हा! फाल्गुनी पाठक, पार्थिव गोहिल यांसारख्या कलाकारांचे इनडोअर आणि आउटडोअर गरबा कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित आहेत. तिकिटांच्या किमती ४९९ रुपयांपासून सुरू होत आहेत. यावर्षी पावसामुळे अनेक कार्यक्रम आत आयोजित करण्यात आले आहेत.

मुंबईत इथं होणार सर्वात स्पेशल नवरात्रोत्सव ? टॉप 10 गरबा कोणते? पाहा A टू Z डिटेल्स
| Updated on: Sep 23, 2025 | 12:23 AM
Share

राज्यात आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी या नवरात्रीनिमित्तचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गरबा, दांडिया रास यांशिवाय नवरात्रोत्सव पूर्णच होऊ शकत नाही. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या सन्मानार्थ गरबा खेळला जातो. यावेळी रंगीबेरंगी पारंपरिक पोशाख परिधान करून, हातात लाकडी दांड्या घेऊन वर्तुळाकारात नाचले जाते. या नृत्याद्वारे लोक देवीची पूजा करतात आणि एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. यंदा मुंबईत बहुतांश ठिकाणी नवरात्रीनिमित्त गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रीनिमित्त यंदा अनेक लोकप्रिय गरबा कार्यक्रम इनडोअर साजरे केले जाणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून अनेकदा नवरात्रीत पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मैदानात चिखल होतो आणि गरबा खेळण्यासाठी आलेल्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होते. याच कारणामुळे यंदा अनेक ठिकाणी इनडोअर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे रात्री उशिरापर्यंत नृत्याचा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.

प्रमुख गरबा सोहळे आणि वैशिष्ट्ये

मुंबईतील दांडिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फाल्गुनी पाठक यांचा कार्यक्रम यंदा प्रथमच बोरिवली सोडून बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. त्यांच्या कार्यक्रमाची फी प्रति दिवस 1,799 रुपये आहे. या कार्यक्रमासाठी खासगी पोड्सची सोय देखील करण्यात आली आहे.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार्थिव गोहिल यांच्या आवाजात ‘रंगिलो रे नवरात्री’चे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील हा गरबा इनडोअर गरबाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. याची एका दिवसाची फी 999 रुपये आहे. बोरीवलीतील अरुणकुमार वैद्य मैदानात गरबा प्रिन्सेस ऐश्वर्या मुजुमदार यांच्या रंगताळी कार्यक्रमाची धूम पाहायला मिळणार आहे. यासाठी मुंबईतील सर्वात मोठा एसी डोम उभारण्यात आला आहे.

फी काय?

दक्षिण मुंबईत वरळीच्या एसव्हीपी स्टेडियममधील ‘डोम दांडिया नाईट्स’ हे आकर्षण ठरत आहे. रिया भट्टाचार्य यांच्यासोबत येथे गरबा करण्याची संधी चाहत्यांना उपलब्ध होणार आहे. यासाठी 799 रुपये तिकीट असणार आहे. याशिवाय, बोरीवलीमध्ये भूमी त्रिवेदी यांचा ‘रंग रास नवरात्री’ आणि गीता रबारी यांचा ‘शो ग्लिट्झ नवरात्री उत्सव’ हे गरब्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून याची फी 499 रुपये इतकी आहे.

केवळ मुंबईच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबई, मुलुंड आणि मालाड येथेही गरबाप्रेमींसाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. ठाण्यातील रेमंड ग्राउंडवर ‘ठाणे रास रंग’चे आयोजन करण्यात आले आहे. याची फी 590 रुपये असणार आहे. तर मुलुंड येथील कालिदास ग्राउंडवर प्रेरणा रासची फी 400 रुपये आहे. त्यामुळे यंदा नवरात्रीच्या नऊ दिवसांत पारंपरिक पोशाखात सजलेले मुंबईकर गरबा-दांडियाच्या तालावर मनसोक्त थिरकताना दिसणार आहेत.

मुंबईतील दांडिया कार्यक्रम

  • रेडियन्स दांडिया : जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी येथे – ₹१,७९९ प्रति दिवस.
  • रंगिलो रे नवरात्री : नेस्को सेंटर, गोरेगाव येथे – ₹९९९.
  • रंगताळी नवरात्री  : अरुणकुमार वैद्य मैदान, बोरिवली येथे – ₹९५० प्रति दिवस.
  • डोम दांडिया नाईट्स  : डोम, एसव्हीपी स्टेडियम, वरळी येथे – ₹७९९ पासून.
  • रंग रास नवरात्री : बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान, बोरिवली (प) येथे – ₹४९९ प्रति दिवस.
  • शो-ग्लिट्झ नवरात्री उत्सव : कोरा केंद्र मैदान क्र. ४, बोरिवली येथे – ₹४९९ प्रति दिवस.
  • ठाणे रास रंग : रेमंड मैदान, ठाणे (प) येथे – ₹५९० प्रति दिवस.
  • नवरंग गरबा: मॅरियट एक्झिक्युटिव्ह अपार्टमेंट्स, नवी मुंबई येथे – ₹५०० पासून.
  • प्रेरणा रास  : कालिदास मैदान, मुलुंड येथे – ₹४०० प्रति दिवस.
  • दिव्या रास नवरात्री : इनऑर्बिट मॉल, मालाड येथे – ₹४९९ प्रति दिवस.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.