मुंबईतील कुख्यात गुंडांच्या टोळीचा वंचित आघाडीशी संबंध? मुख्य गुंड जेरबंद, त्याच्या पत्नीचा पळून जाण्याचा प्रयत्न

मुंबईतल्या रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी आणि हप्तावसुली करून अमाप संपत्ती जमवलेल्या एका सराईत गुन्हेगारास दादर लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत (Mumbai police arrest criminal Babloo Thakur)

मुंबईतील कुख्यात गुंडांच्या टोळीचा वंचित आघाडीशी संबंध? मुख्य गुंड जेरबंद, त्याच्या पत्नीचा पळून जाण्याचा प्रयत्न
फेरीवाल्यांकडून हप्तावसुली, कुख्यात गुंड बबलू ठाकूर अखेर जेरबंद, दादर लोहमार्ग पोलिसांची मोठी कारवाई
Follow us
| Updated on: May 29, 2021 | 2:45 PM

मुंबई : मुंबईतल्या रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाल्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी आणि हप्तावसुली करून अमाप संपत्ती जमवलेल्या एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारांना दादर लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संतोषकुमार रामप्रताप सिंग उर्फ बबलू ठाकूर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या पत्नीसह एकूण 6 आरोपींना अटक केली आहे. बबलू ठाकूर याच्यावर मुंबई शहरात गंभीर स्वरूपाचे एकूण 25 हून अधिक गुन्हे दाखल आहेत (Mumbai police arrest criminal Babloo Thakur).

आरोपींचे वंचित बहुजन आघाडीशी संबंध ?

धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे सबंध हे वंचित बहुजन आघाडीशी असल्याचं ते सांगतात. पोलिसांनी जप्त केलेल्या साहित्यात दोन आरोपींकडून वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे लेटरहेड मिळून आली आहेत. संबंधित आरोपी खरोखरच पक्षाशी संबंधित आहेत का? याचा तपास सध्या सुरू आहे. मात्र मुख्य आरोपी बबलू ठाकूर याची आतापर्यंत 3 करोड पेक्षा जास्त संपत्ती आढळून आलीय ज्यामध्ये त्याच्या पत्नीच्या नावावर जवळपास 9 घरे आणि अमाप सोने खरेदी केल्याचं स्पष्ट झालंय (Mumbai police arrest criminal Babloo Thakur).

आरोपींचा पत्राद्वारे पोलिसांना आंदोलनाचा इशारा

विशेष म्हणजे आरोपींनी वंचित बहुजन आघाडीच्या लेटरहेडचा वापर करून रेल्वे आयुक्तांना पत्र लिहिलं. “पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे तो मागे घ्या, अन्यथा पक्षाच्या वतीने आंदोलन करू”, असा इशारा आरोपींनी पत्राद्वारे दिला होता. आरोपी संजय मोहिते याने रेल्वे आयुक्तांना हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्याचं पद वंचित बहुजन आघाडीचा जनरल सेक्रेटरी असल्याचं लिहिलं होतं.

मुख्य आरोपीच्या पत्नीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला

हे फक्त खंडणीच प्रकरण नसून आणखी गंभीर प्रकार यामध्ये स्पष्ट होतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. तपासादरम्यान मुख्य आरोपी बबलू ठाकूर याची पत्नी रिटा सिंग हिला अटक करून दादर रेल्वे पोलीस ठाण्यात असता तीने लेडी कॉन्स्टेबलच्या हाताला झटका दिला. त्यानंतर रेल्वेसमोर उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एपीआय अर्जुन घनवट यांनी जीवाची बाजी लावून रेल्वेसमोर उडी मारून आरोपी महिलेला वाचवलं. त्यामुळे त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनाच कौतुकही केलं जातंय.

पोलिसांचा तपास सुरु

या गुन्ह्यातील आरोपींनी जरी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या नावाचा वापर केला असला तरी त्यांचा पक्षाशी काही संबंध आहे का? ते अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र मुख्य आरोपी बबलू ठाकूर मुंबईत सराईत गुन्हेगारांना एकत्र करून ही टोळी चालवत होता. त्यातून तो अमाप संपत्ती जमवत होता. तसेच तपासादरम्यान आणखी काही आरोपी अजून स्पष्ट होतील, असा अंदाज पोलिसांना आहे.

पत्राचे फोटो :

संबंधित बातमी : VIDEO: गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी पळण्याच्या प्रयत्नात रेल्वे ट्रॅकवर पडली, पोलीस अधिकाऱ्याने वाचवला जीव

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.