AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Police : मुंबई पोलिसांत पुन्हा बदल्या, सचिन वाझेंच्या जागी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती

मुंबई पोलिसांत आज पुन्हा एकदा 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Mumbai Police : मुंबई पोलिसांत पुन्हा बदल्या, सचिन वाझेंच्या जागी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती
मुंबई पोलीस
| Updated on: Mar 30, 2021 | 10:13 PM
Share

मुंबई : सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी झाल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. हेमंत नगराळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांत मोठ्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांत आज पुन्हा एकदा 26 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या प्रभारीपदी नव्या पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. यापूर्वी गुन्हे शाखेचे सर्व प्रभारी बदलण्यात आले आहेत.(Transfer of 26 Police Inspectors in Mumbai Police Force)

सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर आता सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षक मिलिंद काठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने सचिन वाझे या API दर्जाच्या अधिकाऱ्याला या पदावर बसवण्यात आलं होतं. त्यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सीआययू पथकाच्या प्रभारीपदी पोलीस निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. तर खंडणीविरोधी पथकाच्या प्रभारीपदी पीआय योगेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

23 मार्च रोजी 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

पोलिसांच्या बदल्यांसाठी राज्यात मोठे रॅकेट सुरु असल्याचा अहवाल दाबल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. संपूर्ण राज्यातून महाविकास आघाडी सरकारवर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेत तब्बल 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजेच मुंबईतील सर्व युनीट प्रमुखांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. सीआययू युनिटचे एपीआय रियजुद्दीन काझी यांना सशस्त्र पोलीस दलात पाठवण्यात आलंय. तर सीआययू युनिटचे एपीआय प्रकाश होवाळ यांची बदली मलबार हिल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी मुकेश अंबानी धमकी प्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत.

फडणवीसांच्या आरोपानंतर मोठ्या हालचाली

मागील काही दिवसांपासून सरकारवर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू, सचिन वाझे खंडणी, मुकेश अंबानी धमकी आणि आता पोलिसांच्या बदल्यांसाठी रॅकेट अशा अनेक प्रकारचे संकटं राज्य सरकारसमोर उभे टाकले आहे. विरोधकांकडून सरकारवर सातत्याने टीका होत आहे. 15 वर्षांपासून निलंबित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पोलीस दलात परत घेतलं जातं. याच पोलिसावर खंडणीचे आरोप होतात, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस दलावरील विश्वास उडाल्याचं म्हटलंय. तसेच, पोलीस दल तसेच राज्य सरकारने चिंतन करण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात हे मोठे बदल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी ! मुंबई पोलीस दलात मोठे बदल, गुन्हे शाखेच्या तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या बदल्या

बदल्यांचा सपाटा, आधी 4 IPS, आता 5 IAS अधिकाऱ्यांची बदली, मंत्रालयापासून विदर्भापर्यंत मोठे बदल

Transfer of 26 Police Inspectors in Mumbai Police Force

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.