मुंबई, नागपूर, पुण्यातील मेट्रोच्या कामांना वेग

मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी आणि नवी मुंबईमध्ये 11.10 किमी मेट्रोच्या कामांचा समावेश आहे.

मुंबई, नागपूर, पुण्यातील मेट्रोच्या कामांना वेग
Follow us
| Updated on: Sep 15, 2019 | 10:28 PM

मुंबई : मुंबई, पुणे आणि नागपूर या तीन शहरात मेट्रोची (Mumbai Pune Nagpur Metro Work) 420 किमीची कामे वेगाने सुरु आहेत. यामध्ये मुंबई शहर व उपनगरांमध्ये 340 किमी, पुण्यामध्ये 31.25 किमी व नागपूरमध्ये 38.215 किमी आणि नवी मुंबईमध्ये 11.10 किमी मेट्रोच्या कामांचा समावेश आहे.

मुंबई शहर व महानगर प्रदेशात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने (Mumbai Pune Nagpur Metro Work)  एकूण 14 मेट्रो मार्ग (Mumbai Metro) उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी दहिसर ते डीएन नगर मेट्रो -2 ए कॉरिडॉर, डीएन नगर ते मंडाले मेट्रो-2 बी, वडाळा ते कासारवडवली मेट्रो -4, स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो – 6 कॉरिडॉर आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो -7 कॉरिडॉर यांचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. या पाचही मार्गामुळे 88.5 किमीचे मेट्रो जाळे तयार होईल. या मेट्रो मार्गांवर जवळपास 97 स्थानके असणार आहेत. या मार्गावरून किमान 50 लाख प्रवाशांची वाहतूक होण्याची शक्यता आहे.

वर्सोवा ते घाटकोपर हा मेट्रो मार्ग 1 सुरू (Mumbai Metro) झाला असून या मार्गावरून दररोज सुमारे 4 लाख प्रवाशांची वाहतूक होत आहे. यामुळे या मार्गावरील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांचा इंधनावरील खर्च, प्रवासाचा वेळ यांची बचत झाल्याचे दिसून येत आहे.

कुलाबा ते सिप्झ या 33.5 किमी अंतराच्या मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू असून (Mumbai Pune Nagpur Metro Work)  यामध्ये 26 भूमिगत स्थानके उभारण्यात येणार आहेत. या मार्गामुळे वाहनांच्या 5 लाख फेऱ्या कमी होणार असून दररोज किमान 3 लाख लिटर इंधनाची बचत होईल. विशेष म्हणजे मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो मार्गांमुळे दरवर्षी सुमारे अडीच लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. तर रस्त्यांवरील वाहतूक 25 ते 30 टक्के कमी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर 2019 रोजी मुंबईतील 42.2 किमीच्या आणखी तीन मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजन केले आहे. यात 9.2 कि.मी. लांबीच्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो -10 कॉरिडोर, 12.7 किमी लांबीचे वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो 11 कॉरिडॉर आणि 20.7 किमी लांबीचा कल्याण ते तळोजा मेट्रो -12 कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

पुणे मेट्रो

पुण्यामध्ये 31.254 किमीच्या दोन मेट्रो (Pune Metro) मार्गाची कामे सुरू आहेत. पहिला मार्ग पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते स्वारगेट हा 16.6 किमीचा असून यामध्ये 14 स्थानके उभारण्यात येतील. तर दुसरा मार्ग वनाज ते रामवाडी हा 14.7 किमीचा असून तो संपूर्ण एलिव्हेटेड असणार आहे. या मार्गावर 16 स्थानके असतील. पहिल्या मार्गाचे काम सन 2021 पर्यंत तर दुसऱ्या मार्गाचे काम डिसेंबर 2020 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नागपूर मेट्रो

नागपूरमध्ये सुमारे 38.21 किमीचा मेट्रो (Nagpur Metro) प्रकल्प राबविण्यात येत आहे. यापैकी 13.5 किमीचा मार्ग कार्यान्वित करण्यात आला आहे. ऊर्वरित मार्गावरील 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. खापरी ते सिताबर्डी या मार्गावरील काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात नागपूर ग्रामीण भागात मेट्रो सुरू करण्यात येणार असून 48.6 किमीच्या टप्प्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला मंजुरी मिळाली आहे. या मार्गावर सुमारे 35 स्थानके उभारली जाणार आहेत.

नवी मुंबई मेट्रो

नवी मुंबईमध्ये सिडकोच्या वतीने बेलापूर ते पेंधर या 11.10 किमीच्या मेट्रोचे (Navi Mumbai Metro) काम सुरू आहे. या मार्गावरील मेट्रोची चाचणी घेण्यात आली आहे. या मार्गावर 11 स्थानके आहेत. तळोजा पाचनंद येथे याचे डेपो व कार्यशाळा उभारण्यात येत आहे. हा मार्ग बेलापूर, खारघर, तळोजा औद्योगिक वसाहत, कळंबोली व खांदेश्वर या भागाला जोडला जाणार आहे. त्यानंतर हा मार्ग प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडण्यात येईल.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.