AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Temperature : मुंबईच्या तापमानात घट सुरुच, किमान तापमान 14 अंश राहणार, IMD चा अंदाज

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळतेय. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai Temperature) रविवारी निचांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती.

Mumbai Temperature : मुंबईच्या तापमानात घट सुरुच, किमान तापमान 14 अंश राहणार, IMD चा अंदाज
मुंबईत लोकांनी शेकोट्या पेटवल्या (Photo Credit: ANI Twitter)
| Edited By: | Updated on: Jan 25, 2022 | 11:05 AM
Share

मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळतेय. महाराष्ट्राची (Maharashtra) राजधानी मुंबईत (Mumbai Temperature) रविवारी निचांकी कमाल तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी किमान तापमानात 6 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली. मंगळवारी म्हणजेच आज किमान तापमान 14 अंश राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आला आहे. सोमवारी मुंबईतील सांताक्रुझ येथील केंद्रामध्ये किमान तापमान 15 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं तर रविवारी कमाल तापमान 21 अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं दिसून आलं. दुसरीकडे कुलाबा येथील वेधशाळेत 16.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. सोमवारी दिवसाचे कमाल तापमान 24 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं. कुलाबा येथील वेधशाळेत 24.6 अंश तर सांताक्रूझ येथील वेधशाळेत 24.8 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली

मुंबईत हुडहुडी कायम राहणार

मुंबईत आणखी पुढचे काही दिवस तापमानात घट होणार असल्याचा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. पाकिस्तानच्या बलूचिस्तान मधून येणाऱ्या धुळीच्या वादळामुळे मुंबईच्या वातावरणावर परिणाम झालेला दिसून आलाय. जानेवारी महिन्यात मुंबईतील तापमान 24 अंश सेल्सिअस असणे ही दुर्मिळ घटना समजली जाते. गेल्या दशकामध्ये जानेवारी महिन्यात 25.3 अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. ही नोंद 17 जानेवारी 2020 रोजी झाली होती. रविवारी सांताक्रुज येथील केंद्रामध्ये कमाल तापमान 23.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं.

आजही थंडी राहणार

हवामान विभागाच्या तज्ञांनी सांगितल्यानुसार तर पूर्वेकडील वाऱ्यांच्या परिणामामुळे तापमानात घट झाली असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबईतील किमान आणि कमाल तापमान हे मंगळवारी 14 अंश सेल्सिअस ते 25 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकतं. 10 जानेवारी रोजी मुंबईत किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअसवर आलं होतं. या महिन्यातील सर्वात कमी तापमानाची मुंबईतील नोंद होती.

पुढचे तीन दिवस थंडीचा कडाका वाढणार

राज्यात थंडीचा कडाका 8 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिल. 8 फेब्रुवारीनंतर थंडी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होणार आहे. पुण्यात पुढील तीन दिवसात थंडीचा जोर वाढणार आहे. 27 आणि 28 ला तापमानात आणखी घट होणार आहे. राज्यात येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यामुळे आणि पाकिस्तानातून आलेलं धूळीचं वादळ हे अरबी समुद्रावरून आल्यानं हवेत आद्रता जास्त आहे. त्यामुळे थंडीचा कडाका कायम राहणार हवामानत तज्ञ मकरंद कुलकर्णी यांनी अंदाज वर्तवला आहे. वातावरणीय बदलामुळं मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि पुण्यात तापमान कमी झालंय.

इतर बातम्या:

Mumbai Air Quality | मुंबईत दशकातल्या सर्वात धोकादायक हवेची नोंद, कुलाबा, माझगावला सर्वाधिक फटका!

Maharashtra Weather Update : राज्यात हुडहुडी, तापमानाचा पारा घसरला, थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

Mumbai Records six degree fall in Minimum Temperature Mumbai also records cold wave

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.