AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं; संजय राऊतांनी थेट सांगितलं…

Sanjay Raut on India Alliance PM Candidate : 'या' चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं; संजय राऊतांनी थेट सांगितलं... प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत येणार असल्याची चर्चा होतेय. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं. तसंच वंचित सोबत आल्यास जागावाटप कसं असेल यावरही राऊतांनी प्रतिक्रिया दिलीय.

'या' चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं; संजय राऊतांनी थेट सांगितलं...
Sanjay Raut
| Updated on: Dec 26, 2023 | 2:12 PM
Share

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 26 डिसेंबर 2023 : इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा नसल्याची टीका युतीतील नेते करत असतात. युतीचे पंतप्रधानपदाचे कणखर उमेदवार, विरोधकांकडे पर्याय दिसत नाही, अशी टिका अजित पवार यांनी केली होती. विरोधकांच्या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. इंडिया आघाडीची सत्ता आल्यास चार नेत्यांपैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणालेत. त्याला राऊतांनी उत्तर दिलं. युतीकडे गेल्या 10 वर्षांपासून एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि उद्धव ठाकरे यांच्यापैकी कुणीही पंतप्रधान होऊ शकतं, असं संजय राऊत म्हणालेत.

आंबेडकर इंडिया आघाडीत येणार?

प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. 24-24 हा त्यांच सुरूवातीपासूनचा प्रस्ताव आहे. वंचितला आम्ही सन्मानानं सामिल करून घेऊ. नरेंद्र मोदींचा पराभव झाला नाही. तर सर्वांना तिहार जेलमध्ये जावं लागेल, ही प्रकाश आंबेडकरांची तीव्र भावना आहे. बाबासाहेबांचा वारसा ते जपतायत, त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत, असं राऊत म्हणालेत.

भाजपवर निशाणा

मंदिरात जाणारा हा भक्त असतो. पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी.. हे भगवान विष्णूचे 13 वे अवतार प्रभू श्रीरामांचं बोट धरून मंदिरात नेतायेत. त्यांनी पोस्टरवर लावलेत, त्यांनी आधी कोण vip कोण सामान्य यावर बोलावं. आम्ही सामान्य म्हणून राम मंदिराच्या लढ्यात उतरलो. तेव्हा आजचे vip कुठे गेले होते? राम मंदिर पाडलं तेव्हा ही लोकं कुठे होती? बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला टोला लगावला.

अशोक सिंघल यांना विचारा, तेव्हा मातोश्रीवर कशा बैठका होत होत्या? 2024 नंतर कुणाचं हिंदुत्व ते दिसेल. भारतीय जनता पक्षाने घाबरून शिवसेनेवरती हे खापर फोडलं. उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्याची गरज नाही. आम्ही अयोद्धेतच आहोत. आम्ही सर्वजण अयोध्येत जाऊ, असं राऊत म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.