AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना कोर्टाचा दणका, थेट याचिकाच फेटाळली

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्यासह सहा जणांवर ईडीने गुन्हा दाखल केलाय. याचप्रकरणी भुजबळ बंधूंनी कोर्टात धाव घेतली होती. पण कोर्टाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

मोठी बातमी, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना कोर्टाचा दणका, थेट याचिकाच फेटाळली
| Updated on: Oct 27, 2023 | 6:21 PM
Share

ब्रिजभान जैसवार, Tv9 मराठी, मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह आणखी 4 जणांना कोर्टाने दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं देखील या प्रकरणात नाव आलं होतं. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. तर पंकज भुजबळ हे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. या प्रकरणावर सातत्याने चर्चा होत असते. याप्रकरणावर कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. पण न्यायमूर्तींनी आज याचिकाच फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह सत्यन केसरकर, संजय जोशी, तन्वीर शेख, राजेश धारप अशी इतर 4 आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावी, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने हीच याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांना मुंबई हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.

‘आम्ही हायकोर्टात अपील करणार’

याप्रकरणी ईडीने छगन भुजबळ यांच्यासह 52 आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा, एसीबी प्रकरणात दिलासा मिळाल्यानं ईडीने दाखल गुन्हा रद्द करावं, अशी 6 आरोपींची मागणी आहे. याप्रकरणी तब्बल एक वर्षांपासून सुनावणी सुरु होती. मात्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी तांत्रिक मुद्द्यांवरुन याचिका फेटाळली आहे. त्यानंतर आता आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही हायकोर्टात अपील करणार, असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळ यांना दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगवास भोगावा लागला आहे. मुंबई सेशन कोर्टाने छगन भुजबळ यांना सप्टेंबर 2021 मध्ये क्लीन चीट दिली होती. त्यांच्यासह एकूण सहा जणांना याप्रकरणी कोर्टाने क्लीन चीट दिली होती. या प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि काँग्रेस नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत गंभीर आरोप केले होते.

छगन भुजबळ सामाजिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी आपल्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाने विविध कंत्राटांच्या माध्यमातून आर्थिक फायदा करुन दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यामध्ये भुजबळ यांच्याशी संबंधित अनेक कंपन्यांना लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याच प्रकरणी 2015 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून या प्रकरणी वेगवेगळ्या घडामोडी घडत आल्या आहेत.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.