‘या’ एकाच तत्वावर महाविकास आघाडीचं जागावाटप; संजय राऊतांनी सिक्रेट फॉर्म्युला सांगितला

MP Sanjay Raut on Loksabha Election 2024 Mahavikas Aghadi Jagavatap : लोकसभा निवडणूक अन् महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला...; संजय राऊत यांचं स्पष्ट भाष्य. लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विश्वास ते भाजपवर निशाणा संजय राऊत यांची सविस्तर प्रतिक्रिया. वाचा...

'या' एकाच तत्वावर महाविकास आघाडीचं जागावाटप; संजय राऊतांनी सिक्रेट फॉर्म्युला सांगितला
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 12:07 PM

गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 27 डिसेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप कसं होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्मुला सांगितला आहे. जो जिंकेल त्याची जागा… हे आमचं सूत्र आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. तसंच इंडियाचा चेहरा कोण असेल? यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.  तसंच येत्या निवडणुकीत इंडिया आघाडीच निवडणूक जिंकेल, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केलाय.

जागावाटपावर काय म्हणाले संजय राऊत?

ज्या चर्चा आहेत त्या आम्ही वृत्तपत्रातून पाहतोय. आमचं असं म्हणणं आहे आणि ते सर्वांना माहीत आहे. प्रकाश आंबेडकर म्हणजे आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी जेव्हा चर्चा होत असते तेव्हा ही आम्ही त्यांना सांगतो जिंकेल त्याची जागा आहे हे आमचं सूत्र आहे. आमच्या आघाडीमध्ये जागेवरून ओढताण नाही. होणारही नाही. जागांचं वाटप जे आहे ते निवडून देण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार यावरती आमच्या तिन्ही पक्षाच एक मत आहे या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत, असं संजय राऊत म्हणाले.

वंचित बहुजन आघाडीला देखील नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही विरुद्ध लढायचं आहे. नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले, तर या देशाला हुकूमशाहीच्या काही ढकलत जाईल. विरोधी पक्षाला तिहार जेलमध्ये जाऊन बसावं लागेल. प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशासाठी फार मोठा मंत्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, या संविधानाचे महत्त्व सर्वात जास्त त्यांना माहिती आहे. संविधान वाचवण्याची आम्ही लढतो आहोत.

इंडिया आघाडीचा चेहरा कोण?

इंडिया आघाडीचा चेहरा कोण? अशी वारंवार विचारला होते. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी इंडिया आघाडीची एकजूट महत्वाची आहे. निवडणुकीनंतर आम्ही चेहरा ठरवू असं म्हटलं. यावर राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणतात ते खरं आहे. इंडिया आघाडीसाठी कोणत्याही चेहऱ्याची गरज नाही. ज्या देशात तानाशाही आहे. त्या तानाशाहीचा राजकीय गट आहे तो गट तानाशाहीचा आपला एक चेहरा समोर आणतो. लोकशाहीत खूप चेहरे असतात. त्यामुळे लोकं कोणालाही निवडतात हे महत्वाचं आहे. असं राऊत म्हणालेत.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.