AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Shivsena Uddhav Thackeray Group Leder Itern in BJP Today : शिवसेना ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार; आज सकाळी 10 वाजता ठाकरे गटाचा मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.... भाजपच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश होईल. कोण आहे हा नेता? वाचा...

ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Mar 30, 2024 | 7:59 AM
Share

देशात लोकसभा निवडणूक होत आहे. सगळीकडे निवडणुकीचं वारं वाहतंय. शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. अशातच आता ऐन निवडणूक काळात ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे यांचा निकटवर्तीय, विश्वासू नेता भाजपमध्ये प्रवेश आज प्रवेश करणार आहे. मात्र हा बडा नेता कोण याबाबतची स्पष्टता आलेली नाही. या नेत्याचं नाव कळू शकलेलं नाही. पण राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलं आहे.

बड्या नेत्याचा आज भाजपमध्ये प्रवेश

ठाकरे गटाचा बडा नेता आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. हा बडा नेता कोण? या नेत्याचं अद्याप समोर आलेलं नाही. मात्र आज सकाळी ठाकरे गटाचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.आज सकाळी 10. 30 वाजता भाजपच्या मुंबईतील नरिमन पॉईंटच्या पक्ष कार्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे. हा नेते नेमका कोण आहे, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

‘त्या’ महिला नेत्याची आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट

काँग्रेसचे नेते, पंजाबचे माजी राज्यापाल, माजी मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनीही काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय वर्तुळात घडत आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

ठाकरेंना धक्का; तर भाजपची ताकद वाढणार

लोकसभा निवडणूक होत आहे. भाजप, शिवसेना- शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट विरूद्ध काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात यंदा राज्यात थेट लढत होत आहे. लोकसभेची एक-एक जागा महत्वाची आहे. यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. अशात जर बडा नेता ठाकरेंना सोडून भाजपमध्ये गेला तर ठाकरेंसाठी तो धक्का असेल तर भाजपची ताकद वाढवणारा असेल.

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र