कहाणी मुंबईच्या वडापावची, कोण आहे वडापावचा जनक, कसा ‘लोकल टू ग्लोबल’ बनला वडापाव
world vada pav day 2024: मुंबईतून वडापाव जगभर पसरला. सचिन तेंडुलकरपासून नितीन गडकरीपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या वडापावची उगमकथा काय आहे? सर्वात आधी वडापाव कुठे आणि केव्हा बनवला गेला? मुंबईतून जगभर कसा पसरला वडापाव? पाहू या वडापावसंदर्भात सर्व काही...

स्वस्त आणि खाण्यास सोयीस्कर… भूक लागल्यानंतर पटकन सर्वत्र सहज मिळणारा… खमंग, झणझणीत पदार्थ म्हणजे वडापाव… खवय्यांच्या जीभेला पाणी सोडणारा मुंबईचा स्ट्रीट फूड असलेला वडापाव ‘लोकल टू ग्लोबल’ झाला आहे. महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्ये वडापाव अविभाज्य घटक झाला आहे. सेलिब्रिटी असो की सर्वसामान्य सर्वांचा आवडता खाद्यपदार्थ म्हणून वडापावने मान्यता मिळावली आहे. मॅकडॉनाल्डच्या बड्या स्टोअरमधील बर्गरपेक्षा हे भारतीय बर्गर वडापाव महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाला आहे. त्याची ओळख देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. आतातर सात समुद्रापार वडापाव मिळू लागला आहे. यामुळेच 23 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक वडापाव दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मग या...
