AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता

विहंग सरनाईक यांना ईडीनं दोन वेळा समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंगला ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता
| Updated on: Nov 30, 2020 | 8:58 AM
Share

मुंबई: टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग सरनाईक यांना आज अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकले होते. त्यावेळी विहंग सरनाईक यांना ईडी कार्यालयात घेऊन जात 4 तास चौकशीही केली होती. त्यानंतर विहंग यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावण्यात आलं. पण ते ईडीसमोर हजर झाले नाहीत.(Vihang Sarnaik is likely to be summoned again by the ED)

विहंग सरनाईक यांना ईडीनं दोन वेळा समन्स बजावलं आहे. मात्र ते चौकशीला हजर झाले नाहीत. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना ईडीकडून चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे. ही चौकशी टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमित चांदोळेंना तीन दिवसाची कोठडी

टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळे यांची ईडीने कसून चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. 26 नोव्हेंबरला सकाळी ईडीने चांदोळे यांना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने चांदोळे यांना तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे. चांदोळे यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील ही अत्यंत महत्त्वाची चौकशी मानली जात चांदोळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ईडी पुढील सूत्रे हलवणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ईडीची सरनाईकांच्या घर, कार्यालयावर छापेमारी

दरम्यान, ईडीने 24 नोव्हेंबर रोजी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली होती. ईडीने सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी सरनाईक मुंबईत नव्हते. ते भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते भारतात आले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार असलेल्या अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

Vihang Sarnaik is likely to be summoned again by the ED

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...