वरळी कोळीवाड्यामागे समुद्राला लागून अनधिकृत बांधकामं, स्थानिकांची पालिका अधिकाऱ्यांकडे धाव

आतापर्यंत अशी दहा ते पंधरा घरे या ठिकाणी उभारली असून ती भाड्याने दिली जातात, किंवा लाखोंमध्ये विकली जात आहेत, असा दावाही स्थानिकांनी केला आहे.

वरळी कोळीवाड्यामागे समुद्राला लागून अनधिकृत बांधकामं, स्थानिकांची पालिका अधिकाऱ्यांकडे धाव
Worli Koliwada
अंकिता म्हसाळकर

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 30, 2021 | 1:20 PM

मुंबई : कोरोना काळात वरळी कोळीवाड्याच्या मागील बाजूस समुद्राला लागून अनेक अनधिकृत बांधकामे झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीतील समुद्र किनाऱ्यावरील खडक आणि वाळू चोरुन तिथेच अनधिकृत घरे बांधून ती भाड्याने दिली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. वरळीतील नागरिकांनी दक्षिण वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांची भेट घेतली.

काय आहे आरोप

या भागात स्थानिक भूमाफियांची दादागिरी वाढली असून त्यांनी बांधलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत अशी दहा ते पंधरा घरे या ठिकाणी उभारली असून ती भाड्याने दिली जातात, किंवा लाखोंमध्ये विकली जात आहेत, असा दावाही स्थानिकांनी केला आहे.

गोल्फादेवी वसाहतीतील रहिवाशांवर आरोप

विशेष म्हणजे गोल्फादेवी वसाहतीतच राहणाऱ्या काही लोकांनी ही घरे बांधली असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. खोटे पुरावे दाखवून या घरांना वीज जोडणीही देण्यात आली आहे. या ठिकाणी परप्रांतीय मजुरांना भाड्याने घरे दिली जात आहेत. गोल्फादेवी वसाहतीचा पुनर्विकास करण्यात येणाऱ्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेत 698 घरे अधिकृत आहेत. हे जे अनधिकृत पंधरा ते वीस घर समुद्राला लागून बांधलेली आहे त्याला लागूनच समुद्र किनारपट्टीवर जेवढी कायदेशीर घरं आहेत त्यांनाही बीएमसीकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे हे रहिवाशी आज जी साऊथ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना भेटण्यास आणि पुरावे देण्यास आले.

वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांकडून पुरावे सादर

अनधिकृत बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीची प्रत आणि झोपडीत संरक्षण पात्र ठरवण्यासाठी शासन नियमानुसार 2000 पूर्वीचे आणि सध्याचे वास्तव्याचे पुरावे तात्काळ 24 तासाच्या आत जी दक्षिण विभाग कार्यालयात या रहिवाशांना करायचे आहे, अन्यथा शासनाच्या आदेशानुसार बांधकाम अनधिकृत गृहीत धरून निष्कासित करण्यात येईल. त्यामुळे वरळी कोळीवाड्यातील रहिवासी आपले पुरावे घेऊन स्पष्टीकरण देण्यासाठी सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांना भेटण्यास आले.

संबंधित बातम्या :

आदित्य ठाकरेंचा ‘वरळी पॅटर्न’ माझ्या मतदारसंघात राबवा, भाजप आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Mumbai Worli Koliwada residents complaint about illegal construction near beach)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें