AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत 9 लाख किशोरवयीन मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर

मुंबईतल्या 9 लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेनं 9 जम्बो लसीकरण केंद्र सज्ज केलीयत. सध्या जम्बो लसीकरण केंद्रातून ही लस दिली जाणार आहे तर काही दिवसातच ती शाळेतच कशी उपलब्ध होईल याची सोय केली जाणार आहे.

मुंबईत 9 लाख किशोरवयीन मुला मुलींच्या लसीकरणासाठी पालिका सज्ज, लसीकरण केंद्राची यादी एका क्लिकवर
कोरोना प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 8:15 AM
Share

मुंबईसह महाराष्ट्रात आजपासून किशोरवयीन मुलांचं लसीकरण सुरु होतंय. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. ज्यांचं वय 15 ते 18 वर्षा दरम्यान आहे अशा सर्व मुला मुलींनी कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मुंबईत त्याची सुरुवात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. फक्त मुंबईच नाही तर पुणे, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक ह्या महत्वाच्या शहरातही शाळकरी (किशोरवयीन) मुला मुलींसाठी ही लसीकरण मोहीम राबवली जातेय.

मुंबईतल्या 9 लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. (Mumbai Corona vaccine center list) त्यासाठी महापालिकेनं 9 जम्बो लसीकरण केंद्र सज्ज केलीयत. सध्या जम्बो लसीकरण केंद्रातून ही लस दिली जाणार आहे तर काही दिवसातच ती शाळेतच कशी उपलब्ध होईल याची सोय केली जाणार आहे. मुंबईत नेमक्या कोणत्या ठिकाणी ही लस उपलब्ध असेल ते पाहुयात.

मुंबईतली लसीकरण केंद्र

  1. ए,बी,सी,डी,ई ह्या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळ्यातल्या रिचर्डसन कुडास कोविड लसीकरण केंद्र

2. एफ/उत्तर , एल, एम / पूर्व, एम/ पश्चिम या 4 विभागांसाठी सायनच्या सोमय्या मैदानावरील जम्बो कोविड लसीकरण केंद्र

3. एफ/ दक्षिण जी/ दक्षिण जी/ उत्तर ह्या तीन विभागांसाठी वरळीचं एनएससीय डोम जम्बो कोविड लसीकरण केंद्र

4. एच/ पूर्व के/ पूर्व एच/ पश्चिम ह्या तीन विभागासाठी वांद्रे कुर्ला संकुलातील बीकेसी जम्बो कोविड सेंटर

5. के पश्चिम/ पी दक्षिण/ ह्या दोन विभागासाठी गोरेगाव पूर्वचं नेस्को जम्बो कोविड लसीकरण केंद्र

6. आर/ दक्षिण पी/ उत्तर ह्या दोन विभागांसाठी मालाड पश्चिमचे मालाड जम्बो कोविड लसीकरण सेंटर

7. आर /मध्य, आर/ उत्तर ह्या विभागांसाठी दहिसर जम्बो कोविड लसीकरण सेंटर

8. एन एस विभागासाठी कांजूरमार्ग पूर्वचं क्रॉप्टन अँड ग्रीव्हज जम्बो कोविड लसीकरण सेंटर

9. टी विभागासाठी मुलुंड पश्चिम मधील रिचर्डसन कुडास मुलुंड जम्बो कोविड लसीकरण केंद्र

10. परळमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय इथे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुला मुलांसाठी लसीकरण केंद्र

हे सुद्धा वाचा:

Nashik Suicide | आई मला माफ कर, सुसाईड नोट लिहित विवाहितेची आत्महत्या

विमा कंपनीच्या सेवेवर नाराजी, अशी करा पोर्टेबिलिटी, वैद्यकीय विमा योजनांची तूलना करा, कंपनी बदला 

Children Vaccination | आजपासून राज्यात लहान मुलांचे लसीकरण, नावनोंदणी कशी करावी, लस नेमकी कोणाला मिळणार ?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.