Nana Patole : मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची शंका; नाना म्हणतात, चार दिवसात काय चमत्कार घडला?

Nana Patole : मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची शंका; नाना म्हणतात, चार दिवसात काय चमत्कार घडला?
मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणावर काँग्रेसची शंका; नाना म्हणतात, चार दिवसात काय चमत्कार घडला?
Image Credit source: tv9 marathi

Nana Patole : ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

भीमराव गवळी

|

May 18, 2022 | 7:29 PM

मुंबई: मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) मध्यप्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह पंचायत समितीची निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासहीत निवडणुका होणार असल्याने आता भाजपने त्यावरून सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धारले आहे. मध्यप्रदेशाला जे जमलं ते आघाडी सरकारला का जमत नाही? असा सवाल भाजपने केला आहे. तर मध्यप्रदेश सरकारला आरक्षण देण्याची परवानगी मिळाल्याने काँग्रेसने त्यावर शंका उपस्थित केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही शंका उपस्थित केली आहे. चार दिवसात असा काय चमत्कार घडला? मध्यप्रदेशाला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याची परवानगी परवानगीही मिळाली. नेमकं काय घडलं? असा सवाल नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसत आहे. चारच दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला ज्या सुचना केल्या होत्या. त्याच सुचना मध्यप्रदेश सरकारलाही केल्या होत्या, मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला की, मध्य प्रदेशला ओबीसी आरक्षणासह निडणुका घेण्यास परवानगी दिली, असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

असा कोणता डेटा दिला?

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर महाराष्ट्र मागील दोन वर्षापासून लढा देत आहे परंतु महाराष्ट्राची केंद्र सरकारकडून सातत्याने अडवणूक केली जात आहे. या आरक्षणासाठी इम्पिरीकल डेटाची आवश्यकता होती तो डेटा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला. नंतर सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्ट करण्याचे निर्देश दिले. ही लढाई सुरु असताना मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. हे प्रकरणही सुप्रीम कोर्टात गेले आणि आता मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची परवानगी दिली जाते. या चार दिवसात काय चमत्कार झाला? मध्य प्रदेश सरकारने कोणता डेटा दिला ज्यावर सुप्रीम कोर्टाचे समाधान झाले? केंद्र सरकारने तो डेटा मध्य प्रदेश सरकारला दिला काय? असाही प्रश्न उपस्थित होतो, असं ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील

सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची प्रत अजून मिळालेली नाही. ती प्रत मिळाल्यानंतर अभ्यास करून त्यावर पुढील भूमिका ठरवू. काँग्रेस पक्ष सातत्याने ओबीसींच्या आरक्षणासाठी लढा देत आहे. परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्ष या मुद्द्यावर राजकारण करून महाराष्ट्रातील ओबीसी समाजाला आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवू इच्छित आहे, असे असले तरी ओबीसी आरक्षणासहच राज्यातील निवडणुका होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें