“संपलेल्या माणसांना मला संजीवनी…”, नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांच्यासोबतचा वाद एका वाक्यात संपवला
Narayan Rane Big Statement : दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या सध्या चर्चाच त्या काय सुरू आहे. पण त्याचे साईड इफेक्ट राज्यात उमटत आहेत. नारायण राणे, नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत. त्यातून वेगळेच वाद उभे ठाकले आहेत. अर्थात या वादाने काही काळ खळबळ उडते इतके मात्र नक्की.

दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा जागर गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सुरू आहे. राज्यातील राजकारण पुन्हा कूस बदलण्यासाठी आसूसलेले आहे. या दोन वर्षांत राजकारणात एक वेगळीच शिथिलता आली आहे. त्यामुळेच जेव्हा राजकारणात अचानक उकळ्या फुटतात तेव्हा ती बातमी झाल्याशिवाय राहत नाही. त्याची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या सध्या चर्चाच त्या काय सुरू आहे. पण त्याचे साईड इफेक्ट राज्यात उमटत आहेत. नारायण राणे, नितेश राणे हे आक्रमक झाले आहेत. त्यातून वेगळेच वाद उभे ठाकले आहेत. या वादातून साध्य काही होत नाही पण चर्चेचा ज्वर मात्र चढतो.
नारायण राणे – प्रकाश महाजन वादाचा धमाका
मंत्री नितेश राणे यांनी धाराशिवला येऊन महायुतीमधील शिंदे सेनेवर तोंडसुख घेतानाच मनसे आणि ठाकरे गटाला डिवचले. त्यानंतर मराठवाड्यातून मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नितेश राणेंवर जहरी टीका केली. नारायण राणे यांनी त्याचा समाचार घेतल्यावर प्रकाश महाजन यांनी दंड थोपटावत त्यांना खुलं आव्हानच दिलं. इतक्यावर थांबतील ते प्रकाश महाजन कसले? त्यांनी एकदम झपाटल्यागत छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौक गाठला आणि राणे यांना आव्हान दिले. वेळ पडली तर कणकवली गाठण्याची भाषा केली. आता हे नाट्य राज्यभरात पाहिल्या गेले.




राणे यांनी विषय संपवला
नारायण राणे यांनी या नाट्यानंतर पत्र परिषद घेतली. त्यांनी प्रकाश महाजन यांच्या आंदोलनाविषयी फारसं भाष्य केले नाही. त्यांनी अवघ्या एका वाक्यात हा विषय संपवला. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेले चहाच्या पेल्यातील वादळाची हवाच त्यांनी काढली.
प्रकाश महाजन यांच्या आंदोलनाविषयी बोलताना मला त्यांच्या कुठल्याच प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही. त्यांना महत्व मला द्यायचं नाही. मी त्यांना अनेक वर्ष ओळखत आहे. संपलेल्या माणसांना मला संजीवनी द्यायची नाही त्यांच्या प्रश्नाला मला उत्तर द्यायचं नाही. ते जिथे असतील तिथे मी पोहोचेल. त्यांच्यात काय दम आहे ते मी पाहिलं आहे, असा टोला नारायण राणे यांनी लगावला. ते ठाकरे यांच्या यांची बाजू लावून धरतात की नाही मला नाहीत नाही असे ते म्हणाले. प्रकाश महाजन यांना कोण कशाला मारेल. त्यांना मारून कोण 302 अंगावर घेईल, अशी मिश्किल टिप्पणी पण त्यांनी केली.
मनसे-ठाकरे युतीवर तोंडसुख
एकत्र येऊ द्या, चांगलं नांदू द्या. लोकांना बंधू- प्रेम दाखवून द्या. एकत्र आले तरी राजकारणात काही फरक पडणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका समोर असल्याने ते हालचाली करतात. काही फरक पडणार नाही. कोणत्याही पक्षाला, मी राज ठाकरे यांना काही सल्ला देऊ शकत नाही असे नारायण राणे म्हणाले.