AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जैन नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी मागितली जाहीर माफी

भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी ‘मीरा-भाईंदर जैन नगरीही म्हटलं जातं या त्यांच्या वक्तव्यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी यावेळी इतरही मुद्यांवर भाष्य केलं आहे.

'जैन नगरी’ वक्तव्यावरुन चौफेर टीका; भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी मागितली जाहीर माफी
narendra mehta apologyImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 2:53 PM
Share

मीरा भाईंदर ही जैन नगरी आहे, असं म्हटलं होतं, त्यानंतर आमदार नरेंद्र मेहतांचं स्पष्टीकरण दिलं आहे. जैन समाजाच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारल्यावरून राजकीय कार्यक्रम असल्याची चर्चा झाल्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हा राजकीय कार्यक्रम नव्हता, असं त्यांनी म्हटलं. आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करत त्यांनी मीरा-भाईंदरमधील विविध समाजांच्या मागण्यांवरही भूमिका मांडली.

नेमकं काय म्हणाले आमदार मेहता?

जैन समाजाच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात पुरस्कार स्वीकारला; तो राजकीय कार्यक्रम नव्हता, असं स्पष्टीकरण भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी दिलं. मीरा-भाईंदरमध्ये जैन समाजाची मोठी वस्ती असून त्या भागाला जैन नगरीही म्हटलं जातं, असा दावा मेहतांनी केला. मीरा-भाईंदर हे सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचं शहर आहे. आगरी-कोळींच्या गावातून शहराची निर्मिती झाली, असंही मेहतांनी स्पष्ट केलं. आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत नरेंद्र मेहतांनी आता माफी मागितली आहे. कत्तलखान्याला विरोधाची मागणी जैन आणि कॅथलिक समाजाकडूनही झाली होती, त्यामुळे समाजाच्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचा मेहतांनी दावा केला आहे. सत्तेत आल्यानंतर विविध समाजांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचं काम केलं, असं मेहतांनी सांगितलं.

सूर्या धरणाच्या पाण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतचं लक्ष्य, तर वीज पोल आणि इलेक्ट्रिक कामासाठी परवानग्यांचा मुद्दा असल्याचं मेहतांनी सांगितलं. शाळेतील कांदा-लसूण अर्थात कंदमुळांच्या विषयावरही मेहतांनी स्पष्टीकरण दिलं; हा विषय 30 वर्षांपासूनचा असून विद्यार्थ्यांनी डबे शेअर करू नयेत, अशी विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं. कोणावरही बंधन घातलेलं नव्हतं, असा दावा करत मेहतांनी शाळेतील निर्णयाचं समर्थन केलं.

कत्तलखान्याला विरोधाची मागणी जैन आणि कॅथलिक समाजाकडूनही झाली होती, त्यामुळे समाजाच्या मागणीनुसार निर्णय घेतल्याचा त्यांचा दावा आहे. सूर्या धरणाच्या पाण्याचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंतचं लक्ष्य असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच, शाळेतील कांदा-लसूण आणि इतर कंदमुळांच्या विषयावरही त्यांनी स्पष्टीकरण देत हा विषय 30 वर्षांपासूनचा असल्याचं म्हटलं. विद्यार्थ्यांनी डबे शेअर करू नयेत, अशी विनंती करण्यात आली होती; कोणावरही बंधन घातलं नव्हतं, असा दावा त्यांनी केला.

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा