“हिंदुत्वाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला”; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या वर्मावर घाव घातला

आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका अशी टीकाही शिंदे गटाने त्यांच्यावर केली आहे.

हिंदुत्वाच्या पाठीत यांनी खंजीर खुपसला; शिंदे गटाच्या नेत्यानं ठाकरे गटाच्या वर्मावर घाव घातला
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 5:56 PM

मुंबईः ठाकरे गटाचे आणि विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी पलटवार करत ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. नरेश म्हस्के यांनी अंबादास दानवे व राजन विचारे यांच्यासह उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, अंबादास दानवे यांची संभाजीनगरमध्ये नगरसेवक होण्याची पात्रता नाही म्हणत त्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

तर जितेंद्र आव्हाड प्रभू रामचंद्र आणि रावण, छत्रपती शिवाजी महाराज, शाहिस्तेखान आणि औरंगजेब यांची तुलना करतात, त्या माणसांच्या मांडीला मांडी लावून हे बसतात त्यामुळे त्यांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही अशी खोचक टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

कटकारस्थान करणाऱ्या दाऊदबरोबर जे असताता त्याला यांच्या मंत्रिमंडळात स्थान असते असे म्हणत त्यांनी नवाब मलिक यांचे नाव घेत त्यांच्यावर टीका केली आहे.

तर ठाकरे गटाला आता शिवसेनाप्रमुख हिंदूहृदय सम्राट असं म्हणायला यांना लाज वाटते. त्यामुळे ही लोकं बाळासाहेब ठाकरे यांना वंदनीय म्हणायला लागले.

त्यामुळे त्यांनी हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसला असून त्याच्याबद्दल यांनी प्रथम बोलावं असे थेट आव्हान नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाला केले आहे.

ज्या संभाजीनगरमधून विधान परिषदेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच निवडून आले आहेत. त्यांना तिकडे कोण विचारतं, आणि त्यांची नगरसेवक तरी होण्याची त्यांची पात्रता नाही अशी जहरी टीका त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर केली आहे.

मलंगड यात्रेवरूनही त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाहीत म्हणून काय झालं. मलंगड यात्रेत ते येऊ शकले असते.

मात्र त्यांना घरात बसून हिंदुत्व टिकवायचं आहे. फक्त मतांकरिता हिंदुत्वाची भाषा करायची आहे अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बॅनर लावलेले आहेत, त्यावर आमचे फोटो टाकलेले आहेत. यावर जितेंद्र आवड यांची प्रतिक्रिया घ्यावी,

त्यांचे नगरसेवक जर आम्हाला भेटत असतील त्यांना सोडून जात असेल तर त्याचा जाब त्यांना विचारावा अशी टीका करत जितेंद्र आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे.

आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आले त्यावेळेस हिंदुत्वाचा विचार करतात

विरोधी पक्ष नेते श्रीमलंगगड यात्रेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत.

त्यामुळे हे हिंदुत्व आमचं आहे अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेते राजेंद्र विचारे यांनी दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांना विचारला असता,

त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका फक्त निवडणूक आली की त्यावेळेसच फक्त तुम्ही हिंदुत्वाचा विचार करता त्यामुळे त्यांनी हा विचार करू नका

धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारसा पुढे घेऊन जात आहेत. विरोधकांकडे काही गोष्टी उरल्या नाहीत त्यामुळे आता टीका करतात. म्हणून आम्ही त्याकडे लक्ष देत नाही अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.