खारघरमध्ये लहानग्यांच्या शाळेत कैद्यांची ‘भरती’, 200 कैदी विलगीकरणात, 11 पोलिसांवर जबाबदारी

| Updated on: Jun 18, 2020 | 6:19 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात 200 कैदी ठेवण्यात आले असून सुरक्षेसाठी केवळ 11 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

खारघरमध्ये लहानग्यांच्या शाळेत कैद्यांची भरती, 200 कैदी विलगीकरणात, 11 पोलिसांवर जबाबदारी
Follow us on

नवी मुंबई : जून महिना उजाडला की शाळेत विद्यार्थ्यांची (Prisoners Quarantined At Khargar School) अ‍ॅडमिशनसाठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, नवी मुंबईतील खारघरमध्ये चक्क कैद्यांची शाळा भरली. खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये आतापर्यंत 200 कैद्यांनी प्रवेश केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्रात 200 कैदी ठेवण्यात आले असून सुरक्षेसाठी केवळ 11 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. खारघरमध्ये सेक्टर 12 मध्ये गोखले शाळा आहे. सेक्टर 12 हा परिसर नेहमी गजबजलेला (Prisoners Quarantined At Khargar School) असतो.

खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांची क्षमता 2,124 असून सध्या कारागृहात दोन हजाराहून अधिक कैदी शिक्षा भोगत आहेत. एप्रिल महिन्यात मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काही कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने सावध भूमिका घेत नव्याने येणाऱ्या कैद्यांसाठी खारघरमधील गोखले शाळेत विलगीकरण केंद्राची निर्मिती केली. सुरुवातीला केवळ 20 कैदी या शाळेत ठेवण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात भर पडली असून सध्या या शाळेत 200 पेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आले आहे.

कारागृह पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 200 कैद्यांच्या सुरक्षेसाठी केवळ 11 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यात दिवसा 5 तर रात्र पाळीसाठी 6 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच, शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर नवी मुंबई पोलीस मुख्यालयाचे चार पोलीस तैनात करण्यात आले आहे. शाळेच्या सर्व खोल्या कैद्यांनी भरल्यामुळे पोलिसांना डोळ्यात तेल घालून रात्रीच्या वेळी जागता पहारा द्यावा लागत (Prisoners Quarantined At Khargar School) आहे.

संबंधित बातम्या :

Nagpur Corona : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 32 नवे रुग्ण

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट थेट बीएमसीकडे का? मनसेचा सवाल, रुग्णाला रिपोर्ट कळवण्याची मागणी