Nagpur Corona : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 32 नवे रुग्ण

कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत (Corona Patient increase in Nagpur) आहे.

Nagpur Corona : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, दिवसभरात 32 नवे रुग्ण

नागपूर : कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत (Corona Patient increase in Nagpur) आहे. नागपूर जिल्ह्यात काल (17 जून) एका दिवसात 32 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 1109 वर पोहोचली आहे. 3 दिवसात 104 कोरोना रुग्ण जिल्ह्यात आढळून आले (Corona Patient increase in Nagpur) आहे.

जिल्ह्यात काल कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 18 वर पोहोचली आहे. तर नागपूरातून काल 45 रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील काही भाग कोरोनामुक्त झाले आहेत. नागपूरमधील 13 कोरोनाबाधित वस्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे या परिसरातील प्रतिबंध हटवण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.

दरम्यान, राज्यातही रुग्णांची वाढ सातत्याने होत आहे. राज्यात काल 3 हजार 307 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 59 हजार 166 रुग्ण बरे झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update : राज्यात दिवसभरात 3 हजार 307 नवे कोरोना रुग्ण, बाधितांचा आकडा 1 लाख 16 हजार 752 वर

नागपूरकरांना दिलासा, 13 वस्त्यांमध्ये एकही नवा कोरोनाबाधित नाही, प्रतिबंध क्षेत्रातून वगळले

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *