फळांचे दर पडले, संत्री, सफरचंद, अननस उत्पादकांची अडचण, ग्राहकांची चंगळ

नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये 300 गाड्यांची आवक झाली असून फळांचे दरात घसरण झाली आहे.

फळांचे दर पडले, संत्री, सफरचंद, अननस उत्पादकांची अडचण, ग्राहकांची चंगळ

नवी मुंबई : नवी मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये 300 गाड्यांची आवक झाली असून फळांच्या दरात घसरण झाली आहे. ग्राहक नसल्याने मालाला उठाव नाही. आज बाजारात संत्रीच्या आवक वाढली असून संत्री 5000 क्विंटल, सफरचंद 1000 क्विंटल, कलिंगड 3000 क्विंटल ,अननस 1200 क्विंटल, द्राक्ष 450 क्विंटल दाखल झाली आहे. (Navi Mumbai APMC Market fruit rate decreases)

फळमार्केटमध्ये सफरचंद 80 ते 90 रुपये, डाळिंब 75 ते 150 रुपये, संत्री 20 ते 25, द्राक्ष 60 ते 80 रुपये ,अननस 24 ते 30 रुपये ,पपई 14 ते 16 रुपये, कलिंगड 5 ते 7 रुपये, अंजीर 60 ते 75 रुपये, चिकू 20 ते 25 प्रतिकिलोने विकली जात आहेत.

मार्गशीर्ष महिन्यापासून फळांची आवक जास्त असते आणि ग्राहकांची वर्दळ देखील जास्त असते. मात्र सध्या बाजार आवारात आवक वाढल्याने फळांच्या दरात घसरण झाली आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे फळांच्या किंमतींनी सणासुदीच्या काळात आसमान गाठले होते. मात्र आता फळांच्या किंमतीत घसरण झाली आहे.

बाजार आवारात संत्र्याच्या आवक जास्त झाल्याने पूर्ण मार्केटमध्ये संत्री दिसून येत आहे. संत्र्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून 20 ते 25 रुपये किलोदराने विकला जात आहे. तसेच 130 रुपये किलो दराने विकला जाणारा सफरचंद सध्या बाजारात 60 ते 70 रुपये दराने विकला जात आहे. डाळिंब 70 ते 150 रुपये, अननस 20 ते 30 रुपये , द्राक्ष 60 ते 80 रुपये, कलिंगड 5 ते 8 रुपये, पपई 10 ते 15 रुपये किलोने विकली जात आहे.

व्यापाऱ्याने बाचतित केल्यानंतर त्यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांच्या आंदोलनमुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये जाणारं संत्री बंद झालं आहे. त्यामुळे मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये आवक वाढली आहे. दर पडले असल्याने आता सर्वसामान्य नागरिक देखील सफरचंद आणि संत्राची चव घेऊ शकतात. मात्र किरकोळ बाजारामध्ये कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने फळांचे भाव वाढून ते विकले जात आहेत. त्यामुळे दरवाढीचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे. (Navi Mumbai APMC Market fruit rate decreases)

हे ही वाचा

आवक वाढली, मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरुच

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI