AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं, त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार

महाराष्ट्र सरकार टिकणार नाही असं राणे म्हणत होते, ते तारीख पे तारीख देत होते. राणे साहेब तुमच्यासारखे भित्रे लोक मंत्रिमंडळात राहिले नाहीत, जे घाबरायचे त्यांनी पक्ष सोडलाय.25 वर्ष हे सरकार चालणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

भित्र्या लोकांनी पक्षांतर करत मंत्रिपद मिळवलं, त्यांनी ठाकरे सरकारची काळजी करु नये, नवाब मलिकांचा नारायण राणेंवर पलटवार
नवाब मलिक नारायण राणे
| Edited By: | Updated on: Nov 05, 2021 | 1:41 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. नारायण राणे यांच्यासारख्या भित्रे लोक आता मंत्रिंडळात राहिलेले नाहीत. ते घाबरले म्हणून त्यांनी पक्षांतर केलं आणि मंत्रिपद मिळवलं. त्यामुळे नारायण राणे काहीही बोलत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक नेमकं काय म्हणाले?

नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिलेले नाहीत. राणे घाबरले म्हणून त्यांनी भाजमध्ये पक्ष प्रवेश केला. आता‌ त्यांना केंद्रीय मंत्रिपदाच्या स्वरुपात बक्षिसी मिळाली म्हणून ते‌ काहीही बोलत आहेत, असा पलटवार नवाब मलिक यांनी केला.

महाविकास आघाडी सरकार 25 वर्ष चालणार

राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो. कारवाईच्या भीतीनं ज्यांनी पक्ष‌प्रवेश करुन मंत्रिपद मिळवलं त्यांनी आम्हाला काही सांगायची गरज‌ नाही, असं नवाब मलिक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे सरकार 25 वर्ष चालणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळं नारायण राणेंनी सरकार कधी पडणार यांची काळजी करु नये, असा टोला देखील मलिक यांनी लगावला. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नारायण राणे तारखा देत होते. आता सरकार पडणार मग पडणार, अशा तारीख पे तारीख देण त्यांच्याकडून सुरु होते. मात्र, राणेसाहेब तुमच्यासारखे भित्रे लोक आता राहिलेले नाहीत. हे सरकार 25 वर्ष चालणार आहे त्यामुळे भित्रे लोक ज्यांनी पक्षातंर केलं त्यांना झोपा लागत नाहीत, असा टोला मलिक यांनी नारायण राणे यांच्यासंह भाजपमध्ये इतर गेलेल्या नेत्यांना लगावला.

कोणाच्या कुटुंबापर्यंत गेलो नाही

मी कोणाच्या कुटुंबापर्यंत मी गेलो नाही. पण, ड्रग्जचा पैसा आला तर त्यातून अल्बम बनवला जातो त्यावर गप्प बसायचे का, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी केला. मोहित‌ कंबोजवर याच्या आरोपावर बोलण्यास नवाब मलिक यांनी नकार दिला. चोर मचाये शोर त्यांना बोलू द्या काय बोलायचे, असं नवाब मलिक म्हणाले.

नारायण राणे काय म्हणाले होते?

नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर थेट हल्लाबोल केला. सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही. हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल. त्यांना कळणारही नाही. भ्रष्टाचारामुळेच हे सरकार जाईल, असा दावा राणेंनी केला.

इतर बातम्या:

शर्ट, पँट पाहण्यासाठी नवाब मलिक दुसऱ्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?, ही चांगली सवय नाही; राणेंची जोरदार बॅटिंग

‘नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं’, गिरीश महाजनांची मलिकांवर खोचक टीका

Nawab Malik gave answer to Narayan Rane said he need not think about Mahavikas Aghadi Government

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.