‘नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं’, गिरीश महाजनांची मलिकांवर खोचक टीका

नवाब मलिक हे बेछूट झाले आहेत. मनात येईल ते बोलत आहेत. आज बुट, सॉक्स, पँट पर्यंत येवून गेले. उद्या त्यांनी खालचे कपडेही काढले नाही तर बरं, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. आई, बाप, बहीण काढून अतिशय खालच्या थराचं राजकारण नवाब मलिक करत असल्याचा घणाङात त्यांनी केलाय. त्याचवेळी मलिकांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्लाही महाजन यांनी दिला आहे.

'नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं', गिरीश महाजनांची मलिकांवर खोचक टीका
नवाब मलिक, गिरीश महाजन


जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर खंडणी, लाचखोरीसह बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर समीर वानखेडेंकडे 70 हजार शर्ट, 2 लाखांचे बूट आणि 15 कोटींची संपत्ती असल्याचा दावा नवाब मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी केलाय. मलिकांच्या या आरोपावरुन आता भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मलिकांवर खोचक टीका केलीय. नवाब मलिकांनी खालचे कपडे काढले नाहीत तर बरं, असं वक्तव्य महाजन यांनी केलंय. (Girish Mahajan’s reply to Nawab Malik’s criticism of Sameer Wankhede)

नवाब मलिक हे बेछूट झाले आहेत. मनात येईल ते बोलत आहेत. आज बुट, सॉक्स, पँट पर्यंत येवून गेले. उद्या त्यांनी खालचे कपडेही काढले नाही तर बरं, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली आहे. आई, बाप, बहीण काढून अतिशय खालच्या थराचं राजकारण नवाब मलिक करत असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. त्याचवेळी मलिकांनी बोलताना तारतम्य बाळगावं, असा सल्लाही महाजन यांनी दिला आहे.

मलिकांचा समीर वानखेडेंवरील नेमका आरोप काय?

वाब मलिक यांनी 2 नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची माळ लावली. वानखेडेंकडे महागडे बूट आहेत. लुई वेटॉनच्या बुटांची किंमत 2-2 लाख रुपये आहे. ते नेहमी बूट बदलत असतात. त्यांचं शर्टही 50 हजारापेक्षा अधिक किंमतीचं आहे. टी शर्टची किंमत 30 हजारापासून सुरू होते. ते जी ट्राऊजर परिधान करतात त्याची किंमत लाखो आहे. तर शर्टची किंमत 70 हजार रुपये आहे. त्याशिवाय ते 25 ते 30 लाखाचं घड्याळ वापरतात, असा दावा मलिक यांनी केला.

‘हे तर मोदींच्याही पुढे गेले’

समीर वानखेडेंचं शर्ट 70 हजार रुपयांचं कसं? त्यांची पँट लाखाची, पट्टा दोन लाखाचा, बुट अडीच लाखाचे, घडी 50 लाखांची, रोज नवीन कपडे घालतात. हे तर मोदींच्याही पुढे निघाले. एखादा अधिकारी एवढे महागडे कपडे घालत असेल तर तो प्रामाणिक कसा? असा सवालच त्यांनी केला.

यास्मिन वानखेडेंचं प्रत्युत्तर

मलिकांच्या प्रश्नावर समीर वानखेडे यांच्या बहीण यास्मिन वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिकांनी पुरव्यांशिवाय बेताल आणि खोटी वक्तव्य करू नयेत. समीर वानखेडेच्या हातात असलेले घड्याळ त्यांना त्यांच्या आईने सतरा वर्षांपूर्वी गिफ्ट केले होते. तेच घड्याळ ते आजही वापरत असल्याचे यास्मिन वानखेडे यांनी म्हटले. समीर वानखेडे वर्षातून एकदाच शॉपिंग करतात असंही यास्मिन वानखेडे म्हणाल्या.

संबंधित बातम्या :

‘फडणवीसांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावं’, रोहित पवारांची खोचक टीका

देशातील भटक्या जमातींना ओबीसीबाहेर आरक्षण देण्याचा विचार सुरू, रामदास आठवलेंची माहिती

Girish Mahajan’s reply to NCP Leader Nawab Malik’s criticism of Sameer Wankhede

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI