आंदोलक शेतकरी हिंदू नाहीत का?; नवाब मलिक यांचा भाजपला सवाल

| Updated on: Feb 02, 2021 | 11:01 AM

नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

आंदोलक शेतकरी हिंदू नाहीत का?; नवाब मलिक यांचा भाजपला सवाल
नवाब मलिक, अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकास मंत्री
Follow us on

मुंबई: नवी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यातच भाजप नेत्यांनी कृषी कायद्यांवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच टीका सुरू केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक संतापले आहेत. शेतकरी आंदोलनात पंजाबचेच नाही तर इतर राज्याचेही शेतकरी आहेत, असं सांगतानाच आंदोलनातील शेतकरी हिंदू नाहीत का? असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

नवाब मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं गेलं. ट्रॅक्टर आंदोलनात घुसून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोनल चिघळवण्याचा प्रयत्न केला. आता भाजप धर्माचा आधार घेऊन आंदोलन करत असून हे चुकीचं आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी हिंदू नाहीत का? असा सवालही त्यांनी केला.

बजेटमध्ये दीडपट हमी भाव देण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी हमी भावाची मागणी करत आहेत. तुम्ही त्यांना लेखी का लिहून देत नाही, असं सांगतानाच दिल्लीतील आंदोलनात केवळ पंजाबचेच शेतकरी नाहीत, तर इतर राज्यांचेही शेतकरी आहेत. त्यामुळे केवळ हे आंदोलन पंजाब-हरियाणा पुरतं मर्यादित असल्याचं चित्रं उभं करू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. शिवसेना नेते संजय राऊत आज गाझीपूरला जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेत ठरल्यानुसार ते जात आहेत. या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी पाठिंबा दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा अधिकार

यावेळी त्यांनी वीज वितरणावरही भाष्य केलं. खासगी कंपन्यांना वीज वितरणाचा अधिकार आहे. वीज दर निश्चित करण्याचा अधिकार सरकारचा नाही. एमआरसी वीज दरवाढीचा निर्णय घेत असते. त्याबद्दल जास्त काही बोलता येणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

फोटो कुणासोबत काढला त्याला अर्थ नाही

यावेळी त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका गुन्हेगारासोबत काढलेल्या फोटोवरही प्रतिक्रिया दिली. कोण कुणासोबत फोटो काढतो याला महत्त्व नाही. रोज शेकडो लोक भेटायला येत असतात. फोटो काढत असतात, असंही ते म्हणाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असताना हा फोटो काढल्याची माहिती आहे. कलाम कुरेशी, सय्यद मातीन आणि जफर बिल्डर हे गंभीर गुन्हे असलेले तिघे जण फोटोत पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विरोधकांनी देशमुख यांना घेरले आहे. तर देशमुख यांनी रोज शेकडो लोक भेटायला येतात. यापुढे काळजी घेऊ, असं सांगत या प्रकरणावर पडदा पाडण्याचं काम केलं आहे. (nawab malik slams bjp over farmers protest in delhi)

 

संबंधित बातम्या:

भर रस्त्यावर शिवसैनिकांची पिस्तूल दाखवून दादागिरी?, व्हिडीओ दाखवत इम्तियाज जलील यांची कारवाईची मागणी

अनिल देशमुखांभोवती गुन्हेगारांचं कोंडाळं, औरंगाबाद दौऱ्यातील फोटो व्हायरल

भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंबाबत घृणास्पद उल्लेख, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून कारवाईचा इशारा
(nawab malik slams bjp over farmers protest in delhi)