AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता फडणवीसांच्या बिगडे नवाबला निलोफर यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, घाबरता कशाला?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची बिगडे नवाब अशी निर्भत्सना करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. (Nawab Malik's Daughter Nilofar Responds To Amrita Fadnavis' 'Bigde Nawab')

अमृता फडणवीसांच्या बिगडे नवाबला निलोफर यांचं प्रत्युत्तर; म्हणाल्या, घाबरता कशाला?
amruta fadnavis
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 7:06 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची बिगडे नवाब अशी निर्भत्सना करणाऱ्या अमृता फडणवीस यांना मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सत्य तुमच्या बाजूने आहे तर घाबरता कशाला? असा सवालच निलोफर मलिक खान यांनी अमृता फडणवीस यांना केला आहे.

निलोफर मलिक खान यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. तुमच्याकडे लपवण्यासारखं काहीच नसेल तर तुम्हाला मलिक यांच्या पत्रकार परिषदांची चिंता वाटता कामा नये. सत्य जर तुमच्या बाजूने आहे तर भीती बाळगू नका. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते उघड केले जातील, असा टोला निलोफर यांनी लगावला आहे.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

नवाब मलिक यांनी ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याचा आरोप केला होता. हा आरोप करताना मलिक यांनी जयदीप राणा आणि अमृता फडणवीसांचा फोटोही व्हायरल केला होता. त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. हे प्रत्युत्तर देताना त्यांनी नवाब मलिक यांचा दोनदा बिगडे नवाब असा उल्लेख केला होता. आम्ही जागृती केली आणि आज आम्हालाच लाथ मारली जाते. आम्हाला कोणतीही राजकीय अभिलाषा नाही. त्यांच्या मागे हात धुवून लागलात हे कोणतं राजकारण आहे. तुम्हाला राजकारण करायचं आणि बिगडे नवाब व्हायचं आहे तर तुम्ही बिगडे नवाबची एनर्जी सुधरे नवाबमध्ये कन्व्हर्ट करा. तरच महाराष्ट्र पुढे जाऊ शकतो. बिगडे नवाबला हे सवाल तुम्हाला विचारावे लागतील . त्यांच्या बॉसला किंवा त्यांच्या सूपर बॉसला, असा हल्ला अमृता फडणवीस यांनी केला होता.

मलिकांचे आरोप काय?

त्यापूर्वी नवाब मलिक यांनी पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते. जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत, असा दावा मलिकांनी केला होता. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

गुड गोईंग… मुख्यमंत्र्यांकडून मलिकांचं कौतुक; तर वरिष्ठांनी मलिकांना थांबवावं, संजय राऊतांचं आवाहन

तेव्हा मान वर करायलाही वेळ मिळाला नाही, आता मानेचं दुखणं वाढलंय: मुख्यमंत्री

Bangladesh Court: बांगलादेशाचे पहिले हिंदू चीफ जस्टिस सुरेंद्र कुमार सिन्हा यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

(Nawab Malik’s Daughter Nilofar Responds To Amrita Fadnavis’ ‘Bigde Nawab’)

Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...