घर फुटलं खूप वाईट वाटतंय; अजित पवार यांच्या विरोधात सख्ख्या भावाची एन्ट्री होताच बड्या नेत्याची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 18, 2024 | 2:11 PM

Ajit Pawar and Sharad Pawar: श्रीनिवास पवार मनमिळावं स्वभावाचे आहेत. ते अतिशय सुज्ञ आहेत. घर फुटलं हे खूप वाईट वाटत आहे. त्यामुळेच श्रीनिवास पवार यांनी जे सांगितलं ते प्रामाणिकपणे सांगितले.

घर फुटलं खूप वाईट वाटतंय; अजित पवार यांच्या विरोधात सख्ख्या भावाची एन्ट्री होताच बड्या नेत्याची प्रतिक्रिया
ajit pawar as shrinivas pawar
Follow us on

ठाणे | 18 मार्च 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडासंदर्भात अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी मन मोकळे केले. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल श्रीनिवास पवार यांनी शाब्दीक फटकारे लगावले आहे. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे, असा घणाघाती हल्ला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर केला होता. त्यावर आता शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी श्रीनिवास पवार यांचे कौतूक केले.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, श्रीनिवास पवार मनमिळावं स्वभावाचे आहेत. ते अतिशय सुज्ञ आहेत. घर फुटलं हे खूप वाईट वाटत आहे. त्यामुळेच श्रीनिवास पवार यांनी जे सांगितलं ते प्रामाणिकपणे सांगितले. आपण आपल्या आजोबांची उमेद वाढवतो आणि हे त्यांच्या मृत्यूची वाट बघतात. आता त्यांना घरातून प्रतिक्रिया मिळत आहे. ते पण सख्यांकडून मिळतेय. पवार कुटुंबात घरात एकी होती. दरवर्षी दिवाळीत ती दिसत होती. परंतु एकत्रित कुटुंब आज फुटलंय, अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

श्रीनिवास पवार यांच्या बोलण्यातून कृतज्ञता

श्रीनिवास पवार यांच्या बोलण्यातून कृतज्ञता दिसत आहे. घरातला सख्खा भाऊ बोलतोय, ज्या माणसाने 50 वर्ष बांधून ठेवलं, जे आज कसे वाईट झालं? असा प्रश्न अजित पवार यांना जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. हे घर फोडल्यामुळे शरद पवार यांना किती यातना होत असतील. शरद पवार यांना मन, भावना, यातना नाही का?
त्यांनी तुम्हाला चारवेळा उपमुख्यमंत्री बनवले, मंत्री बनवले हे श्रीनिवास हे देखील बोलले. आता श्रीनिवास पवार यांना उत्तर द्यायला कोण पुढे येईल? मला बोलणारे आता श्रीनीवास पवारांना बोलतील का?, असे आव्हाड यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

पवार, ठाकरे कुटुंब संपवायचे

शरद पवार हे भाजपचे वैयक्तीक शत्रु आहेत. शरद पवार यांना वेगळे केले तर यांना महाराष्ट्रात यांना ध्रुवीकरण करता येते. त्यासाठी त्यांनी अजित पवार सारखा मासा गळाला लावाला आहे. त्यांना पवार साहेबांचे, ठाकरेंचे कुटुंब संपवायचे आहेत पण महाराष्ट्र होऊ देणार नाही.