AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकाम्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ… यामुळे शरद पवार यांची भेट, जितेंद्र आव्हाड यांचा दावा

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, काल मेळाव्यात रिकाम्या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील. त्यामुळे ते गेली असतील. तसेच शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर त्यांचे मत काय? हे सांगण्यास शरद पवार यांच्याकडे गेले. या सर्व प्रकारानंतर शरद पवार यांनी मोठ्या मनाने त्यांचे दरवाजे उघडले.

रिकाम्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ... यामुळे शरद पवार यांची भेट, जितेंद्र आव्हाड यांचा दावा
जितेंद्र आव्हाड छगन भुजबळ शरद पवार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 15, 2024 | 12:53 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सोमवारी पुन्हा महत्वाची घडामोड झाली. रविवारी राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला करणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ सोमवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. या भेटीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी “टीव्ही ९ मराठी”शी बोलताना आपली भूमिका मांडली. मेळाव्यात काल असलेल्या रिकाम्या खुर्च्या पाहून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असणार? यामुळे ते शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले असतील, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, काल मेळाव्यात रिकाम्या खुर्च्या होत्या. त्या खुर्च्या बघून छगन भुजबळ अस्वस्थ झाले असतील. त्यामुळे ते गेली असतील. तसेच शरद पवार यांच्यावर त्यांनी टीकाही केली होती. त्यानंतर त्यांचे मत काय? हे सांगण्यास शरद पवार यांच्याकडे गेले. या सर्व प्रकारानंतर शरद पवार यांनी मोठ्या मनाने त्यांचे दरवाजे उघडले. हिच महाराष्ट्राची संस्कृती आहे. वैयक्तीक द्वेष करुन खोट्या केसेसमध्ये अडकवणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

भुजबळ यांचा आव्हाड यांना फोन

छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना फोन केला. आरक्षणासंदर्भातील हा विषय आहे. परंतु गेली दोन वर्ष चर्चे भुजबळ यांनी चर्चेला बोलवले नाही. न मराठ्यांच्या चर्चेत बोलवले ना ओबीसींच्या चर्चेत बोलवले. पण आज बोलवत आहे. आम्हालाही स्वत:चे वैयक्तीक काही आहे की नाही? आता शरद पवार यांची भेट कशासाठी आहे, हे मला माहीत नाही आणि ते जाणून घेण्यात मला इंटरेस्ट नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

छगन भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सोमवारी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. त्यामुळे राज्यातील राजकारणात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...