अजित पवार यांच्या आवाहनाविरोधात जितेंद्र आव्हाड यांची भूमिका, तीव्र आंदोलनाचे संकेत

"आता उद्या आम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही साहेबांना जावून सांगू नका की, राजीनामा मागे घ्या म्हणून. पण लोकांचं शरद पवार यांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाला तुम्ही थांबवू शकत नाही", असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवार यांच्या आवाहनाविरोधात जितेंद्र आव्हाड यांची भूमिका, तीव्र आंदोलनाचे संकेत
जितेंद्र आव्हाडImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 7:24 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपल्या पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. या घोषणेला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध केला जातोय. कार्यकर्त्यांचा विरोध पाहता शरद पवार यांनी विचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. शरद पवार यांचा हा निरोप अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा, आंदोलन न करण्याचा आणि राजीनामा न देण्याचं आवाहन केलं. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी त्याविरोधात भूमिका मांडली.

अजित पवार म्हणत आहेत की, राजीनामा देऊ नका, आंदोलन करु नका. अजित पवार यांच्या या भूमिकेबद्दल जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले, “हे बघा कुणाच्या सांगण्यावरुन कधीच आंदोलनं होत नाहीत. आंदोलन उत्सफुर्त असतात. ज्यांचं शरद पवार यांच्यावर प्रेम आहे ते आंदोलन करत आहेत. ठाण्यात आंदोलन सुरु झाली आहेत. लोकं उपोषणाला बसली आहेत.”

‘कार्यकर्त्यांच्या प्रेमाला तुम्ही थांबवू शकत नाहीत’

“आता उद्या आम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही साहेबांना जावून सांगू नका की, राजीनामा मागे घ्या म्हणून. पण लोकांचं शरद पवार यांच्यावर प्रेम आहे. त्यांच्या प्रेमाला तुम्ही थांबवू शकत नाही. उद्या शरद पवार यांनी जरी सांगितलं की या विषयी आंदोलन करु नका. तरीही लोकं करतील. तेवढा आमचा शरद पवार यांच्यावर अधिकार आहे”, अशी भावना जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

“महाराष्ट्रातून उग्र प्रतिक्रिया येत आहेत. कुणालाही शरद पवार यांचा राजीनामा मान्य नाही. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. ही उग्रता उद्यापासून अधिक वाढीला लागेल. उद्यापासून पूर्ण महाराष्ट्रात आंदोलनं सुरु होतील. लोकं शरद पवार यांचंही ऐकायला तयार नाहीत. लोकांचं म्हणणं आहे की, शरद पवार यांना राजीनामाच द्यायचा नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राजकारणात राहायचं?’

“मला विचाराल तर मी 35 ते 40 वर्ष त्यांचा बोट धरुन राजकारणात पुढे आलेलो आहे. ते राजकारणात नसतील तर आम्ही तरी कशाला राजकारणात राहायचं? आमच्यातलं राजकारण संपलं. हीच भावना महाराष्ट्रातील अनेकांची आहे. शरद पवार लोकभावनेचा आदर करणारे आणि लोकशाहीला मानणारे नेते आहेत. मला वाटतं ते लोकांचा विचार करतील. त्यांनी विचार करतो असं सांगितलं आहे. ते नक्की सकारात्मक विचार करतील”, अशी आशा आव्हाडांनी व्यक्त केली.

“आम्ही 40 वर्षे त्यांच्यासोबत आहोत. आमचा त्यांच्यावर अधिकार आहे. त्यांनी या वादळात आम्हाला असं अर्ध सोडून जायचं हे वादळाला समोर जाताना आम्हाला काय त्रास होतोय हेही आम्ही पवार साहेबांना सांगणार आहोत. आम्ही एकीकडे लढायला आहोत. पण आम्हाला त्यांची सावली हवी. आम्हाला बापाची सावली आहे”, असं आव्हाड म्हणाले.

‘शरद पवार यांचा राजीनामा अमान्य’

“पडद्यामागे काय घडतंय हे मला माहिती नाही. पण शरद पवार यांचा राजीनामा अमान्य आहे. मी माझ्या भावना उत्कटपणे व्यक्त करत असतो. त्यांचा राजीनामा आम्हाला अमान्य आहे”, असं तदेखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“शरद पवार हे बडे नेते आहेत. ते काय करु शकतात हे मी सांगू शकत नाही. पण कार्यकर्त्यांच्या भावना सांगण्याचं माझं काम आहे. ते राहतील. ते जबाबदारी पार पाडतील. मविआला सत्तेवर बसवतील हे सगळं खरं आहे. पण ते आम्हाला पक्षाच्या अध्यक्षपदी हवेत”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.