कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार

आर्यन खानचे अपहरण करुन त्याला बेकायदा तुरुंगात डांबल्याप्रकरणी समीर दाऊद वानखेडेची विशेष तपास पथकाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. या विशेष तपास पथकात केंद्र आणि राज्य दोन्हीकडील अधिकाऱ्यांचा समावेश असावा. मग आपण बघू गाडलेले मुडदे कोण उकरुन काढतो आणि वानखेडे यांच्या आर्मीचा पर्दाफाश करतो, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. | Nawab Malik

कंबोज यांच्या आरोपांनंतर नवाब मलिकांचं ट्विट, उद्या वानखेडे आर्मीचा पर्दाफाश करणार
नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 12:34 PM

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोहित कंबोज यांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर नवाब मलिक यांनी ट्विट करुन आपली बाजू मांडली आहे. समीर वानखेडे यांच्या आर्मीचा सदस्य असलेल्या मोहित कंबोज यांनी पत्रकारपरिषद घेऊन खोटे आरोप केले. लोकांची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मी उद्या सत्य सर्वांसमोर आणेन, असे नवाब मलिक यांनी म्हटले.

तसेच आर्यन खानचे अपहरण करुन त्याला बेकायदा तुरुंगात डांबल्याप्रकरणी समीर दाऊद वानखेडेची विशेष तपास पथकाकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली. या विशेष तपास पथकात केंद्र आणि राज्य दोन्हीकडील अधिकाऱ्यांचा समावेश असावा. मग आपण बघू गाडलेले मुडदे कोण उकरुन काढतो आणि वानखेडे यांच्या आर्मीचा पर्दाफाश करतो, असे नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

मोहित कंबोज पत्रकारपरिषदेत काय म्हणाले?

सहा तारखेला महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देशातील मीडियासमोर साक्षीदार, एनसीबी आणि भाजप कार्यकर्त यांचा संबध आहे यासंदर्भातील फोटो माध्यमांसमोर ठेवले. काही व्यक्तिमत्व किरण गोसावी, सॅम डिसूझा आणि मनीष भानूशाली हे प्रभाकर साईल याच्या प्रतिज्ञापत्रातून समाोर आले. मी आज या प्रकरणातील व्हाटस अप चॅट, ऑडिओ क्लिप हे प्रेझेटेशनच्या रुपात समोर मांडणार आहे, असं मोहित कंबोज म्हणाले.

मोहित कंबोज यानं किरण गोसावीचे फोटो माध्यमासमोर मांडले. किरण गोसावी कोण आहेत. मनीष भानुशाली कोण आहे?, कोण आहे प्रभाकर साईल? असा सवाल मोहित कंबोज यांनी विचारला. त्यापूर्वी सुनील पाटील कोण आहेत असा सवाल मोहित कंबोज यांनी उपस्थित केला.

सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड

आर्यन खानसह क्रुझवरील अन्य लोकांना अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (NCB) जाळ्यात अडकवण्यात सुनील पाटील या व्यक्तीने मास्टरमाईंडची भूमिका पार पाडली आहे. सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता असून तो माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पूत्र ऋषिकेश देशमुख यांचा अत्यंत जवळचा मित्र आहे. राष्ट्रवादीच्या अनेक मंत्र्यांशीही सुनील पाटीलचे जवळचे संबंध आहेत, असा दावा भाजपचे पदाधिकारी मोहित कंबोज यांनी केला.

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुनील पाटील हाच आर्यन खान प्रकरणाचा मास्टरमाइंड; मोहित कंबोज यांचा खळबळजनक आरोप

किरण गोसावी हाच राष्ट्रवादीच्या सुनील पाटीलचा पंटर, मोहित कंबोज यांचा मोठा गौप्यस्फोट; ड्रग्जप्रकरणात ट्विस्ट?

नवाब मलिकांकडे 3 हजार कोटींची बेनामी संपत्ती, भंगारवाला करोडपती कसा झाला?; मोहित भारतीय यांचा सवाल