Sharad Pawar health update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Sharad Pawar health update: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
sharad-pawar

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भीमराव गवळी

|

Mar 30, 2021 | 5:46 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उद्या बुधवारी त्यांच्यावर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, त्यांचा पोटदुखीचा त्रास बळावल्याने आजच त्यांना ब्रीच कँडीत दाखल करण्यात आले असून आजच त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (ncp leader sharad pawar unwell, admitted in breach candy hospital)

आज संध्याकाळी शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात आले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रतिभा पवार आणि खासदार सुप्रिया सुळे होत्या. तत्पूर्वी आज दुपारी पवारांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे ब्रीच कँडीच्या डॉक्टरांनी घरी येऊन त्यांची तपासणी केली होती. त्यानंतर आज पवार रुग्णालयात अॅडमिट झाले आहेत. त्यांच्या पोटदुखीचा त्रास बळावल्याने त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर पवारांना ब्रीच कँडीत दहा दिवस निगरानीखाली ठेवण्यात येणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही दुपारी पवारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

दरम्यान, काल पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्याचा सल्ला देण्यात आला होता. शरद पवारांवर उद्या बुधवारी एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली होती.

पश्चिम बंगालचा दौरा रद्द

पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे ते पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारातही भाग घेण्यात येणार नसल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान ते लतादीदी… सर्वांकडून विचारपूस

दरम्यान, पवारांची प्रकृती बिघडल्याचं कळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतरत्न लता मंगेशकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते कमलनाथ, भाजप नेते आशिष शेलार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आदींनी फोन करून विचारपूस केली होती. पवारांनी या सर्वांचे ट्विटरवरून आभारही मानले होते.

संबंधित बातम्या:

“बाळासाहेबांनंतर उद्धवजींना पवारसाहेबांचाच वडिलकीचा आधार, त्यांना लवकर बरं वाटू दे”

Sharad Pawar: शरद पवार रुग्णालयात, बंगालच्या रणांगणात उतरणार नाहीत, कोणकोणते दौरे रद्द?

Sharad Pawar health update : पोटदुखी आणि पित्ताशयाचा त्रास, शरद पवारांना नेमकं काय झालंय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें