Supriya Sule: ‘तर सरकार-विरोधक एकत्र येऊ शकतात’, मतदारसंघ पुनर्रचना बिलावर सुप्रिया सुळे यांचे मोठे संकेत, म्हणाल्या काय?

Supriya Sule on Delimitation Bill: महिला आरक्षण बिल आणि मतदारसंघ पुनर्रचना बिलासाठी मोदी सरकारने पुन्हा कंबर कसली आहे. विरोधकांच्या मनातील किंतू-परंतू दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधी बाकावरील काही पक्षांचे मन वळवण्याचा सरकारकडून प्रयत्न होत असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे.

Supriya Sule: तर सरकार-विरोधक एकत्र येऊ शकतात, मतदारसंघ पुनर्रचना बिलावर सुप्रिया सुळे यांचे मोठे संकेत, म्हणाल्या काय?
'तर सरकार-विरोधक एकत्र येऊ शकतात', मतदारसंघ पुनर्रचना बिलावर सुप्रिया सुळे यांचे मोठे संकेत, म्हणाल्या काय?
| Updated on: Nov 26, 2026 | 8:43 AM

Supriya Sule on Delimitation Bill: मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण बिलावरून भाजप आग्रही आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार या विधेयकावर मत चाचपणी करण्याची शक्यता आहे. अथवा त्यासाठी विशेष सत्र राबवले जाऊ शकते. या बिलाबाबत विरोधकांच्या मनात किंतू-परंतू आहे. विरोधी बाकावरील काही पक्षांशी भाजपने संवाद साधला आहे. त्यांचे मन वळवण्याचाही प्रयत्न गेल्या सहा महिन्यात होत आहे. त्याचवेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

Loading...

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर त्यांची प्रतिक्रिया दिली. या विधेयकावर चर्चा होण्यापूर्वी ते संसदेसमोर सादर करण्यात यावे. या बिलाची संपूर्ण प्रत विरोधकांच्या हाती देण्यात यावी. त्यातील तरतूदी, त्यातील प्रस्तावित कायद्याची माहिती समजल्यावरच त्यावर चर्चा होईल. कदाचित ते चांगले विधेयक ठरू शकते. अनेकदा राष्ट्रीय हित जपण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येत कायदा मंजूर केला आहे, असे सुळे म्हणाल्या.

बिलातील तरतुदी समजून घेणे महत्त्वाचे

खासदार सुप्रिया सुळे यांनी या विधेयकाची संपूर्ण प्रत विरोधकांना देण्याची मागणी केली. कोणताही कायदा तयार होण्यापूर्वीत त्यातील तरतुदी आणि माहिती असणे आवश्यक आहे. हे विधेयक अगोदर संसदेत सादर होऊ द्या. त्यावर चर्चा होऊ द्या. कदाचित ते चांगले विधेयक असेल. पक्षीय विचारधारेपेक्षा राष्ट्रीय हित महत्त्वाचे असते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

काय आहेत दोन्ही विधेयक?

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना, अधिक मतदारसंघांची निर्मिती या नवीन विधेयकामुळे होणार आहे. पण या विधेयकामुळे उत्तर भारतात लोकसभेच्या अधिक जागा वाढतील. लोकसभेतील सदस्य संख्या 850 होण्याची शक्यता आहे. तर दक्षिण भारतात त्या तुलनेत, प्रमाणात कमी जागा वाढतील अशी भीती व्यक्त होत आहे. त्याचा फायदा भाजपला अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे भाजपचा सत्ता सूर्य कधीच मावळणार नाही असाही सूर आळवला जात आहे. जातनिहाय जनगणनेनंतर ही दोन्ही विधेयक सादर व्हावीत असाही सूर आहे. त्यावर विरोधक आणि सरकारमधील तीव्र मतभेद समोर आले आहे. उन्हाळी अधिवेशनात हे दोन्ही विधेयक मंजूर होऊ शकली नव्हती. सरकारची नाचक्की झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us