AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार गटाच्या युवा नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा; म्हणाले, काहीतरी करायचं म्हणून…

Suraj Chavan on Rohit Pawar : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सूरज चव्हाण नेमकं काय म्हणाले? चिन्ह आणि निवडणुकीवर सूरज चव्हाण यांनी काय टीका केली? वाचा सविस्तर...

अजित पवार गटाच्या युवा नेत्याचा रोहित पवारांवर निशाणा; म्हणाले, काहीतरी करायचं म्हणून...
रोहित पवार
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 24, 2024 | 7:56 PM
Share

युवक राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी शरद पवार गटाचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पिपाणी या चिन्हामुळे शरद पवार गटाचं नुकसान झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. यावर बोलताना सूरज चव्हाण यांना टोला लगावला आहे. पिपाणीमुळे तुतारीला कमी मत मिळाली असं म्हणणं चुकीचं आहे. पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यात फरक आहे. काहीतरी मागणी करायची म्हणून केलेली आहे. हा देश संविधानानं चालत असतो. संविधानाच्या आधारावर आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालं आहे. निवडणूक आयोग आणि सुप्रिम कोर्टात विजय आमचा असेल, असं सूरज चव्हाण म्हणालेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना सूरज चव्हाण यांनी हे विधान केलं आहे.

रोहित पवारांच्या दाव्याला प्रत्युत्तर

अजित पवार गटात अस्वस्थता असल्याचं रोहित पवार म्हणाले. यावर राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराच्या मनात चलबिचल नाही. उलट शरद पवार गटातीलच आमदार अजितदादांकडे येतील. रिटायर्ड झालेले लोक शरद पवारांकडे जाताहेत. तरूणांचा ओढा मात्र अजित पवारांकडे आहे. महायुतीसोबत निवडणुका अजित पवार गट लढणार आहे. ज्यांना वाटतं अजित पवार गटा दुस-यासोबत निवडणुका लढेल. तर हे मुंगेरीलाल के हसीन सपने हे बघ आहेत असं मला वाटतं, असं सूरज चव्हाण म्हणाले.

अजित पवार गटात अस्वस्थता?

शरद पवार गटात आता काही लोक पक्षप्रवेश करत आहेत. पण आमच्याकडे येण्यासुद्धा अनेक इच्छुक आहेत. जे येत्या काळात पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या काळात अनेकांचा पक्षात प्रवेश होणार आहे. आमचा कोणताही आमदार हा चलबिचल नाही आहे. सर्व आमदार हे अजित दादांवर विश्वास ठेवून पक्षात राहणार आहेत, असंही सूरज चव्हाण म्हणाले.

अजित पवारांनी पुण्यात बेकायदेशीर कामाविरोधात कारवाई केलीय. पालकमंत्री म्हूणून अजित पवार काम करत आहेत. जागावाटपाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. 80 पेक्षा अधिक जागा लढाव्या अशी आमची भूमिका आहे, असंही सूरज चव्हाणांनी सांगितलं.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी