AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल सत्तार असचं बोलत राहिला तर, आम्ही आमची संस्कृती बाजूला ठेऊ, अमोल मिटकरींचा इशारा…

आमचा पक्ष असं काही बोलत नाही, पण कोणी असं काय बोलला तर आमच्या पक्षाची संस्कृती आम्ही विसरून जाऊ.

अब्दुल सत्तार असचं बोलत राहिला तर, आम्ही आमची संस्कृती बाजूला ठेऊ, अमोल मिटकरींचा इशारा...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Nov 07, 2022 | 5:21 PM
Share

मुंबईः राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी अमोल मिटकरी म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अब्दुल सत्तारांनी केलेले हे वक्तव्य बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रासाठी हे दुर्दैवी आहे. संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याबद्दल जे अपशब्द अब्दुल सत्तार नावाच्या कृषी मंत्र्यांनी वापरले आहेत. त्यावरून अब्दुल सत्तार हा किती विकृत माणूस आहे हे लक्षात येईल.

कोणत्याही आई बहिणीचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे, मात्र हिंदुत्वाच्या नावाचे राजकारण करून अशा पद्धतीची वक्तव्य करुन अब्दुल सत्तार जर असं वागत असेल तर भविष्यात त्याचे त्यांना उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे.

त्याबरोबरच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जे त्यांनी वक्तव्य केले आहे ते चोवीस तासाच्या आत परत यावे नाही तर, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती कोणाला वाईट बोलणे ही नाही मात्र अशावेळी आम्ही आमच्या पक्षाची संस्कृतीसुद्धा विसरून जाऊ, पक्ष बाजूला ठेवू आणि अब्दुल सत्तार असाच बोलले तर त्याची जीभ हासडल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

अब्दुल सत्तार यांनी सु्प्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण आता ढवळून निघाले आहे. या वक्तव्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. औरंगाबादमध्ये अब्दुल सत्तारांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले जात आहे.

Follow Us
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, कोणाला मिळाली संधी?
शरद पवारांच्या पार्टीकडून 10 प्रवक्त्यांची घोषणा, यादी आली समोर; कोणाला संधी मिळाली?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; काय म्हणाले?
NCP कोअर कमिटीच्या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड लाईव्ह; नेमकं काय म्हणाले?
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने