Raosaheb Danve on NCP: बात निकलेगी तो, रावसाहेब दानवेंनी दाराआडचं राजकारण थेट बाहेर आणलं, राष्ट्रवादीला त्यावेळेस शिवसेना नको होती?

| Updated on: Apr 29, 2022 | 5:08 PM

2017मध्ये राष्ट्रवादीशी युतीबाबत चर्चा सुरू होती. पण नंतर राष्ट्रवादीने चर्चेतून माघार घेतली.

Raosaheb Danve on NCP: बात निकलेगी तो, रावसाहेब दानवेंनी दाराआडचं राजकारण थेट बाहेर आणलं, राष्ट्रवादीला त्यावेळेस शिवसेना नको होती?
रावसाहेब दानवेंनी दाराआडचं राजकारण थेट बाहेर आणलं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांनी भाजप-राष्ट्रवादीची युती होणार होती. पण शिवसेनेला तिसरा पक्ष नको होता. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो नाही, असं विधान करून खळबळ उडवून दिली. शेलार यांनी जुन्या खपल्या काढल्याने त्यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी तर राष्ट्रवादीसोबत युती न करण्याचा निर्णय ही आमची चूक होती, असं म्हणून शिवसेनेला डिवचले आहेत. आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनीही त्यावर प्रतिक्रिया देताना बंद दाराआडचं राजकारणच बाहेर आणलं. विशेष म्हमजे ते त्यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या काळात घडलेल्या गोष्टीच बाहेर आणल्या. त्यावेळी राष्ट्रवादी आणि आमची चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीने अचानक चर्चेतून माघार घेतली. केवळ भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार असावं असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. त्यांना शिवसेना युतीत नको होती, असा गौप्यस्फोटच रावसाहेब दानवे यांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

2017मध्ये राष्ट्रवादीशी युतीबाबत चर्चा सुरू होती. पण नंतर राष्ट्रवादीने चर्चेतून माघार घेतली. भाजप आणि राष्ट्रवादी मिळून सरकार बनलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं. त्या सरकारमध्ये शिवसेना नको असा आग्रह राष्ट्रवादीने धरला होता. तेव्हा, 25 ते 30 वर्ष आम्ही शिवसेनेसोबत आहोत आणि आम्ही त्यांना धोका देणे किंवा सोडणं आमच्या मतदाराला पण पसंत पडणार नाही, असं आमचं म्हणणं होतं. या एका मुद्द्यावर सरकार बनवण्याच्या मुद्द्यावर चर्चा फेल ठरली. शिवसेनेला सोबत घेण्यास काय हरकत आहे? आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करू असं आम्ही राष्ट्रवादीला सांगितलं. तेव्हा जे बैठकीत होते, त्यांनी सांगितले की आमची आणि शिवसेनेची विचारधारा एक नाही. त्यामुळे आमचं सरकार बनू शकत नाही, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.

आम्हाला वगळून शिवसेनेचा सरकार बनवण्याचा प्रयत्न होता

राष्ट्रवादीनेच आम्हाला सकारमध्ये सामील होण्याची ऑफर दिली होती. कारण ते स्वबळावर राज्यात कधीच सरकार आणू शकले नव्हते. काँग्रेस आणि शिवसेनेला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. शिवसेनेला हे कळलं होतं आणि भाजपला बाजूला ठेऊन सरकार बनू शकतं का? हाही प्रयत्न शिवसेनेने केला होता. आम्हाला सोडून सरकार बनू शकत का? असा प्रयत्न शिवसेनेने 2017 साली केला होता, असा गौप्यस्फोट दानवे यांनी केला. 2019 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी आमच्या सोबत यायला तयार होती. त्यावेळेसही प्रस्ताव होता. पण त्यावेळेसही आमची भूमिका शिवसेनेला सोबत ठेवण्याची होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

त्यांनी नावं उघडी केली तर आम्हीही करू

आम्हालाही काही गोष्टी उकरून काढायच्या नाहीयेत. पण ते आम्हाला प्रवृत्त करतात म्हणून आम्हाला काही गोष्टी बोलाव्या लागतात. अजूनही काही गोष्टी आहेत. त्या आम्हाला बोलायच्या नाहीयेत. नाव उघड करण्याची गरज नाही. जर त्यांच्याकडून नावं उघडी झाली तर आम्ही पण करू, असा इशाराही त्यांनी दिला.