AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, पेपरच फुटला नाही, तक्रार खोटी? काय होता डाव?

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्याचा दावा खोटा ठरला आहे. सुरुवातीला मोठी खळबळ उडवणारे हे प्रकरण आता बनावट तक्रारीचे निघाले आहे. सूत्रांनुसार, कोणीतरी ई-मेलद्वारे खोटी माहिती दिली होती. या बनावट तक्रारदारांवर आता एमपीएससी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट, पेपरच फुटला नाही, तक्रार खोटी? काय होता डाव?
mpscImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2026 | 1:14 PM
Share

एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर दोन दिवस आधीच फुटला असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पेपर फुटीवर भाष्य करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. औषध निरीक्षक पदाचा पेपर फुटलाच नव्हता. कुणी तरी बनावट ईमेल केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या बनावट तक्रारदारांवर एमपीएससी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एमपीएससी परीक्षा पेपर फुटल्याची तक्रार खोटी असल्याचं समोर आलं आहे. फुटलेल्या पेपरशी औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेशी काही संबंध नाही. तक्रारदारांचे आरोप हा बनाव आहे. गौरव पाटील आणि लोकेश पाटील यांनी इमेल करून एमपीएससीला कळवलं आहे. या दोघांनी काल रात्री एमपीएससीला मेल करून कळून ही तक्रार खोटी आहे असं सांगितलं. पेपर फुटला त्याचा काही संबंध नाही. हा एक बनाव होता. जो पेपर फुटला तो लोकल परीक्षेचा होता, असं मेलमध्ये म्हटलंय. पुन्हा परीक्षा लवकर होणार नाही म्हणून हा कट रचला गेला, असंही समोर आलं आहे. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणी रोहित पवारांचे आरोप निराधार असल्याचं उघड झालं आहे.

नव्या मेलमध्ये काय म्हटलंय?

दिनांक 22 मार्च 2026 रोजी झालेल्या ड्रग इंस्पेक्टर परिक्षेचा पेपर 20 मार्च 2026 रोजी व्हॉट्सपवर व्हायरल झाला असून तो पेपर फुटला अशी तक्रार भी गौरव पाटील / लोकेश पाटील आणि ऋषीकेश गांगर्डे यांनी केली होती. यासंदर्भात अधिक तपास केला असता माझ्या निदर्शनात आले की, 20 मार्च रोजी व्हॉटसअपवर प्रसारित झालेली तथाकथित प्रश्नपत्रिका ही अयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकेच्या अगदी विपरित आहे. आयोगाची 22 मार्च 2028 प्रश्नपत्रिका कोणत्याही परिस्थितीत फुटलेली नसून ऋतूजा आणि मी चेष्टेत ही आयोगाची मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे म्हटले होते. परंतु ऋतुजाला भेटली नसून 20 मार्च 2026 रोजी पाठवलेली प्रश्नपत्रिका आयोगाची नसून इतर टेस्ट सिरीजची (साव) प्रश्नपतिका होती, त्या संदर्भात आयोभाची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नव्हता.

परंतु ऋषीकेश गांगर्डे यांनी त्याचा विपर्यास करून मोठ्या प्रमाणात प्रसारित करुन आयोगाचा पेपर फुटला असल्याचे सर्वत्र सोशल मीडियावर जाहीर केले. आयोगाची 22 मार्च रोजी परिक्षा झाल्यानंतर सदर प्रश्न टाईप करून तीच प्रश्नपत्रिका ऋतुजा हिने 20 मार्च 2028 रोजी पाठवली होती, अशी अफवा पसरविली. कारण ऋषीकेश गांगर्डे स्वत: परीक्षा नापास झाला असून भविष्यात लवकरच ड्रग इन्स्पेक्टरची जाहीरात येणार नाही याची कल्पना करून सदर पेपर परत व्हावा यासाठी पेपर फुटल्याची अफवा पसरविली. माझी आयोगाविरोधात आणि आयोगाचे माननीय सचिव । माननीय अध्यास यांच्या विरोधात कसलीही तक्रार नाही.

आपला विश्वासू

लोकेश पाटील । गौरव पाटील

Follow Us
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका