BJP OBC Morcha: भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर, बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदावर वर्णी तर राज्यातून चौघांना संधी
BJP OBC Morcha National Executive: भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. त्यात मुंबईसह महाराष्ट्रातील चार जणांना संधी मिळाली आहे. बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.

BJP OBC Morcha: भाजप ओबीसी मोर्चाच्या नवीन राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि विभाग प्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी शनिवारी ही घोषणा केली. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने जाहीर झाल्या आहेत. यामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील चार जणांना संधी मिळाली आहे. बबनराव चौधरी यांची उपाध्यक्ष पदी वर्णी लागली आहे. तर क्रिकेटर युझवेंद्र चहल यांच्या नियुक्तीची सर्वात मोठी चर्चा झाली. त्यांना ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील विशेष निमंत्रित म्हणून स्थान मिळालं आहे.
बबनराव चौधरींची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी वर्णी
भाजप ओबीसी मोर्चाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात मुंबई व महाराष्ट्रातून चौघांना संधी देण्यात आली आहे. बबनराव चौधरींची राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे. राहुल केंद्रे यांची राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतून हर्षदा फरांदे व स्मिता काळे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने शनिवारी ओबीसी मोर्चाच्या नवीन राष्ट्रीय पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची यादी जाहीर केली. पक्षाने अधिकृत एक्स प्लॅटफॉर्मवर ही यादी शेअर केली आहे. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. यामध्ये राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय महामंत्री, राष्ट्रीय मंत्री, राष्ट्रीय कोषाध्यक्ष, कार्यालय मंत्री, मीडिया संयोजक, सोशल मीडिया संयोजक, नीती आणि संशोधन संयोजक, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्य अशा पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
ओबीसी मोर्चावर सात राष्ट्रीय उपाध्यक्ष
१. जोगेन मोहन -आसाम
२. ममता मोहंता-ओडिशा
३. संगम लाल गुप्ता- उत्तर प्रदेश
४. बबनराव चौधरी- महाराष्ट्र
५. सत प्रकाश राणा- दिल्ली
६. अर्जुन सहानी – बिहार
७. संगीता बलवंत बिंद-उत्तर प्रदेश
कार्यकारिणीवरील राष्ट्रीय महामंत्री
१. गजेंद्र यादव- दिल्ली
२. प्रमोद मधवाराज- कर्नाटक
३. ललित चंद्राकर – कर्नाटक