Video | ‘मला त्यानं आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो’

| Updated on: Mar 22, 2022 | 10:46 PM

Nitin Nangaonkar with Police Video News : 20 मार्च रोजी हा व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवरुन शेअर केलाय. या व्हिडीओत पोलिसाला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या होत्या

Video | मला त्यानं आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या, पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो
शिव्या घातल्या म्हणून मग थेट नांदगावकरांकडे पोलिसांची धाव!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई : ‘मला त्यानं आई-बहिणीच्या शिव्या दिल्या, पण पोलिस असूनही मी हतबल, काहीच करु शकत नव्हतो’ हे शब्द आहेत एका पोलिसाचेच! पोलिस दलातील (Police employee) एक माणूस आपल्या पैसे मिळवण्यासाठी बिल्डरकडे (Builder) तगादा लावतो. पण पैसे काही मिळत नाहीत. उलट बिल्डरच्या शिव्या पोलिसाला खाव्या लागतात. पोलीस असूनही हतबल झालेल्या या पोलीस कर्मचाऱ्यालाच आता काय करावं, असा प्रश्न पडतो. अखेर तो शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांच्याकडे जातो. नितीन नांदगावकरांना त्यानं आपल्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. यानंतर नितीन नांदगावकरांनी (Nitin Nandgaonkar) बिल्डरला इशारा दिला. पोलिसाचे पैसे परत करण्यासाठी पुढाकार घेतला. या सगळ्यानंतर अखेर पोलिसाला पैसे बिल्डरचे परत केले खरे. पैसे परत मिळाल्यानंतर पोलिसानं नितीन नांदगावकरांचे आभारही मानले. पण त्या आधी पोलिसांना आई-बहिणीच्या शिव्या देण्याइतकी हिम्मत एखाद्याची होतेच कशी? असाही प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला आहे. सोबतच पोलीस असूनही पोलिसांकडे दाद न मागता नितीन नांदगावकरांकडे पोलिसाला जावंस का वाटलं, असा प्रश्न उपस्थित होणं स्वाभाविक आहे.

नेमकं झालंय तरी काय?

नितीन नांदगावकर! आधी मनसेत होते. नंतर शिवसेनेत गेले. अन्यायाला ठेचण्यासाठी आपल्या स्टाईलनं व्हिडीओ बनवून, ते फेसबुकवर टाकून अल्पावधित अनेकांपर्यंत पोहोचलेले नेते म्हणूनही नितीन नांदगावकर ओळखले जाता. आता त्यांनी आणखी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तर चक्क एका पोलिसाला आई-बहिणीवरुन शिव्या देणाऱ्या एकाला नितीन नांदगावकर यांनी अद्दल घडवली आहे.

आई-बहिणीवरुन शिव्या!

20 मार्च रोजी हा व्हिडीओ नितीन नांदगावकर यांनी फेसबुकवरुन शेअर केलाय. या व्हिडीओत पोलिसाला आई-बहिणीवरुन शिव्या देण्यात आल्या होत्या. पोलिसानंही नितीन नांदगावकर यांच्याकडे याबाबत आपलं म्हणणं मांडलं. आपल्या मेहनतीचे पैसे मिळावेल या साठी हा पोलिस कर्मचारी बिल्डरकडे पाठपुरावा करत होता. पण बिल्डर काही पोलिस कर्मचाऱ्याला दाद देईना.

दरम्यान, पैसे मागितल्यानंतर फोनवरुन आपल्याला शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोपही पोलिसानं केल्याचं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. यानंतर नितीन नांदगावकरांनी बिल्डरशी फोनवरुनच संपर्क साधला. त्याला समज दिली. यानंतर नितीन नांदगावकरांच्या एका फोननंच पोलिस कर्मचाऱ्याचे पैसे परत आले.

पोलिसाची ही अवस्था, तर…

पैसे परत मिळाल्यानंतरही पुन्हा नितीन नांदगावकरांचे आभार मानण्यासाठी हा पोलिस त्यांना भेटायला गेला. तेव्हाही नितीन नांदगावकरांनी पोलिसाचे पैसे परत मिळाल्याबाबत समाधान व्यक्त केलंय. तसंच पोलिसांना शिव्या देणाऱ्यांना आपण ठोकणार, असंही ठणकावलंय. इतकंच काय तर पोलिसांना जर बिल्डर जुमानत नसतील तिथं सर्वसामान्य जनतेचे बिल्डरांकडून किती मानसिक खच्चीकरण होत असेल?, असाही प्रश्न नितीन नांदगावकरांनी उपस्थित केलाय.

पाहा व्हिडीओ –

नितीन नांदगावकरांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला साडेतीन हजारपेक्षा जास्त लोकांनी शेअर केलंय. तर जवळपास पाच हजार लोकांनी कमेंट केलंय. पोलिसांची जर न्याय मिळवण्यासाठी, आपल्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी ही ओढाताण होत असेल, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालाय.

संबंधित बातम्या :

अख्या महाराष्ट्रात अशी रंगपंचमी नसेल; गाढवावरुन काढली जाते जावयाची मिरवणूक; ‘त्या’ पाठीमागे हे आहे कारण

नाशिकमध्ये प्रेम संबंधांतून तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार! हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, तिघांना अटक

Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना