AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक प्रचंड गोंधळ घालण्याची शक्यता आहे.

कितीही गोंधळ घाला, नवाब मलिकांचा राजीनामा नाही म्हणजे नाहीच; जयंत पाटलांनी अधिवेशनापूर्वीच ठणकावले
जयंत पाटील
| Updated on: Mar 02, 2022 | 12:07 PM
Share

मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक प्रचंड गोंधळ घालण्याची शक्यता आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना फटकारले आहे. विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असं जयंत पाटील यांनी ठणकावले आहे. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात मलिक यांच्या राजीनाम्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच ठणाठणी होण्याची चिन्हे दिसत आहेत. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारचा इरादा स्पष्ट केला.

नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप करत भाजप त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. खोटेनाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

अध्यक्षाची निवडणूक घेण्याची तयारी

विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल. पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

म्हणून मलिकांवर कारवाई

यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावरही भाष्य केलं. शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.

पवारांनी बोलावली बैठक

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली जाईल. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

VIDEO: तुमचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला जेलमध्ये पाठवल्याशिवाय राहणार नाही; राऊतांचा इशारा

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

Maharashtra News Live Update : मुंबईकर पाणी जपूण वापरा ! भातसा धरणात बिघाड झाल्याने 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.