धनंजय मुंडेंच्या ‘संबंधावर’ पंकजा मुंडे काय बोलणार ?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांवर पंकजा मुंडे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे. Pankaja Munde Dhanajay Munde

धनंजय मुंडेंच्या 'संबंधावर' पंकजा मुंडे काय बोलणार ?
धनंजय मुंडे पंकजा मुंडे

मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. संबंधित तरुणीनं तिच्यावर 2006 पासून अत्याचार सुरु असल्याचा दावा केला आहे. धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर फेसबूक पोस्ट करुन खुलासा केला आहे. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांनी केलेला खुलासा यावर पंकजा मुंडे( Pankaja Munde)काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ( Pankaja Munde how respond to Dhananajay Munde recent controversy)

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता राजकीय दृष्ट्या विरोधक आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता. दोघेही राजकीय दृष्ट्या विरोधात असले तरी वेळोवेळी कौटुंबिक अडचणीच्या प्रश्नी एकत्र आल्याचे पाहायला मिळालं होते. सध्याच्या प्रकरणात पंकजा मुंडे काय भूमिका घेणार किंवा प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागणार आहे.

घरामध्ये संवाद राहावा,धनंजय मुंडेंची भूमिका

धनंजय मुंडे यांनी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि संबंध संबंधांच्या ठिकाणी आहेत. यापूर्वी राजकारणामध्ये कडवटपणा होता. तो कडवटपणा तसाच राहील. पण कुठे तरी आता घरात संवाद राहिला पाहिजे. त्या मताचा मी आहे, असं म्हणत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंनी एक प्रकारे भाजप नेत्या पंकजा मुंडेंना साद घातली होती. धनंजय मुंडे यांना कोरोना संसर्ग झाला होता त्यावेळी पंकजा मुंडेंनी फोनवरुन त्यांची चौकशी केली होती. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय विरोधक असले तरी गेल्या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये राजकारणापलीकडचा संवाद असल्याचं दिसून आलं होतं. धनंजय मुंडे यांच्या विरोधात झालेल्या आरोपांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया काय असेल याकडे परळीकरांसह महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

नवाब मलिक काय म्हणाले?

एखादी तक्रार झाली तर चौकशी होईल मात्र चौकशी पूर्ण होण्यापूर्वी काही बोलता येणार नाही. या प्रकरणात बदनामी करण्याचं षडयंत्र असू शकते मात्र चौकशी झाल्याशिवाय बोलता येत नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

करुणा शर्मापासून दोन मुलं, धनंजय मुंडे यांच्या पोस्टमधील 8 मोठे गौप्यस्फोट

( Pankaja Munde how respond to Dhananajay Munde recent controversy)

Published On - 7:46 pm, Tue, 12 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI