सरकारने चौकश्या लावल्या, परमबीर सिंग यांची कोर्टात धाव; पुन्हा केला गंभीर आरोप

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. (param bir singh moves bombay high court against maharashtra government)

सरकारने चौकश्या लावल्या, परमबीर सिंग यांची कोर्टात धाव; पुन्हा केला गंभीर आरोप
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 4:23 PM

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि होमगार्डचे पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने लावलेल्या चौकश्यांच्या विरोधात परमबीर सिंग यांनी कोर्टात धाव घेतली आहे. (param bir singh moves bombay high court against maharashtra government)

राज्य सरकारने परमबीर सिंग यांची दोन प्रकरणात चौकशी लावली आहे. या चौकश्यांविरोधात सिंग यांनी आज दुपारी कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सिंग यांनी गंभीर आरोप केला आहे. 19 एप्रिल रोजी मी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटलो होतो. यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू करण्यात येणार आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या 4 मे रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.

सिंग यांच्यावर गुन्हा दाखल

दरम्यान, परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे. (param bir singh moves bombay high court against maharashtra government)

संबंधित बातम्या:

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

“आरोग्यमंत्री गांजा ओढून प्रेस घेतात का ?” लसीकरणावरुन गोपीचंद पडळकर यांचा खोचक सवाल

(param bir singh moves bombay high court against maharashtra government)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.