PARAMBIR SINGH : फरार घोषित परमबीर सिंह चंदीगडमध्ये, चौकशीला हजर राहणार-परमबीर सिंह

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 24, 2021 | 6:31 PM

फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली आहे.

PARAMBIR SINGH : फरार घोषित परमबीर सिंह चंदीगडमध्ये, चौकशीला हजर राहणार-परमबीर सिंह
Parambir Singh

मुंबई : फरार घोषित माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती परमबीर सिंह यांनी दिली आहे. परमबीर सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. लवकरच परमबीर सिंह मुंबईतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणांच्या तपासात सहभागी होणार आहेत.

परमबीर यांच्यावर पाच गुन्हे दाखल

परमबीर सिंग यांच्यावर मुंबई आणि आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.

व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याचा आरोप

मुंबई आणि ठाण्यातील अनेक  व्यावसायिकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. तसेच बुकी सोनू जालान यानेही परमबीर सिंह यांनी दहा कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर परमबीर काही काळ गायब झाले होते, त्यामुळे तपास यंत्रणांनी त्यांना फरार घोषित केले होते. परबीर सिंह यांच्यावर पोलीस अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर सिंह अडचणीत

मनसुख हिरेन हत्या आणि अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या आरोपात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेला 100 कोटींच्या खडणीचे टार्गेट दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे पुढील चौकशीत हे प्रकरण कोणते वळण घेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

40 ST कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांवर शरद पवारांचं मौन का? – सदावर्ते

नाशिककरांच्या सहनशीलतेचा अंत, मारेकऱ्यांना अटक करा म्हणत संतापलेले नागरिक रस्त्यावर!

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI