AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parel Laxmi Cottage : परेलमध्ये रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा, अनेक जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, आदेश दिले

Parel Laxmi Cottage :लक्ष्मी कॉटेज इमारतीजवळ शाब्दीक वादावादी आणि घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर वाद आणखी वाढला. लक्ष्मी कॉटेज जवळच गणेश कारखाना आहे. फलकही फाडण्यात आले.

Parel Laxmi Cottage :  परेलमध्ये रात्री दोन गटांमध्ये तुफान राडा, अनेक जण जखमी, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली, आदेश दिले
Parel
| Updated on: Aug 27, 2026 | 3:17 PM
Share

परेलमध्ये बुधवारी रात्री दोन गटांमध्ये हिंसक झडप झाली. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई सुरु असताना या वादाची सुरुवात झाल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं. 50 ते 60 दुचाकीस्वार आणि 30-40 युवक यांच्यात जोरदार वादावादी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अनेक तरुण आणि पोलिस या हिंसाचारात जखमी झाले. भोईवाडा पोलिसांनी विविध कलमांतर्गत तीन जणांविरोधात आणि अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परळ, लालबाग, चिंचपोकळी भागात मोठा तणाव निर्माण झाला होता. दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात दोन्ही बाजूचा जमाव दिसत आहे. दोन्ही बाजूचे लोक वाद घालताना दिसतायत. पोलीस जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. काही दुश्यांमध्ये पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करताना दिसतात.

परेल मध्ये काल रात्री झालेल्या दोन गटातील वादाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लक्ष्मी कॉटेज इमारतीजवळ शाब्दीक वादावादी आणि घोषणाबाजी सुरु झाल्यानंतर वाद आणखी वाढला. लक्ष्मी कॉटेज जवळच गणेश कारखाना आहे. फलकही फाडण्यात आले. “आधी संध्याकाळी 7 च्या सुमारास वाद झाला होता. पण रात्री 9 च्या सुमारास वाद आणखी वाढला. झडप झाल्यानंतर काहीजणांना ताब्यात घेतलं” काही जखमींना उपचारासाठी केईएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं स्थानिक रहिवाशाने IANS ला सांगितलं. द फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे. सध्या परेल-लालबागमध्ये गणेशोत्सवाची लगबग आहे. अजून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली नाही. पण गणेशोत्सवाची लगबग सुरु आहे. मोठ्या मंडळांच्या गणेशमुर्ती मंडपात आणण्याचं काम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर परेल, चिंचपोकळी आणि लालबागमध्ये अतिरिक्त पोलीस पथक तैनात करण्यात आलं आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका

परिस्थिती नियंत्रणात आणली असून वातावरण शांत आहे असं मुंबई पोलिसांनी सांगितलं. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार तिथे उपस्थित आहेत. अफवांवर विश्वास ठेऊ नका असं पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. सध्या या घटनेचा तपास सुरु आहे. घटनाक्रम जुळवला जात आहे. या हिंसक झडपांमध्ये सहभागी असलेल्या लोकांची ओळख पटवण्याचं काम सुरु आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे